गोर सेना गेवराई तालुका प्रसिद्ध प्रमुख अनिल राठोड यांचे आवाहन
प्रेस मीडिया लाईव्ह :
गेवराई | प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रस्थापित राजकीय पक्षांच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी गोर बंजारा सह बहुजन समाजाच्या स्वतःच्या हक्काचा व मालकीचा असा समनक जनता पार्टी नावाचा राजकीय पक्ष दिनांक 9 एप्रिल रोजी माहुरगड येथे लोकार्पण सोहळा होत असल्यामुळे समस्त बहुजन समाजात आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे.
गेली अनेक वर्ष अठरा विश्व दारिद्र्यात पडलेला वंचित सुशील पीडित आणि अपेक्षित प्रस्थापित सत्ताधारी लोकांनी आपले गुलाम समजून जे सामाजिक मानसिक धार्मिक व राजकीय अत्याचार केलेत अशा सगळ्याच गोष्टीपासून व शोषण कर्त्या जाती जमातींना मुक्ती मिळणार असल्याने खेड्यापाड्यातील मतदारांमध्ये नवचैतन्य पसरण्यास सुरुवात झाल्याची दिसते. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली तरी देखील तांडा वाडी वस्ती वरील लोकांची अडचण अजूनही दूर झालेली नाही. या लोकांची रस्त्याची अडचण असेल. पिण्याच्या पाण्याची अडचण असेल. या सर्व अडचणींना हे लोक सामोरे जातात. या सर्व अडचणी दूर होण्यासाठी माहुरगड या ठिकाणी बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी या समनक जनता पार्टीच्या लोकार्पण सोहळ्यात लाखोंच्या लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोर सेना गेवराई तालुका प्रसिद्ध प्रमुख अनिल राठोड यांनी केले आहे