प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
नवी मुंबई, पासपोर्ट व व्हिसाशिवाय तळोजा भागात बेकायदा वास्तव्यास असलेल्या व अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या बोनिफेस ईमेनीके (वय ४५) या नायजेरियन नागरिकाला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी (ता.२८) रात्री तळोजा भागातून अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून तब्बल ११ लाख रुपये ६० हजार रुपये किमतीचे ११६ ग्रॅम वजनाचे (एमडी) मेथाक्युलॉन हा अमली पदार्थ जप्त केला आहे.
तळोजा सेक्टर-२ मधील श्रीकपा रेसिडेन्सी इमारतीत =
तळोजा सेक्टर-२ मधील श्रीकृपा रेसिडेन्सी इमारतीत राहणारा नायजेरिया देशातील नागरिक हा एमडी या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. सय्यद व त्यांचे पथक या इमारतीत दाखल झाले. पोलिसांना पाहून बोनिफेस इमेनिके याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला घराव घालून पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ११ लाख ६० हजार रुपये किमतीचे ११६ ग्रॅम वजनाचे मेथाक्युलॉन हा अमली पदार्थ सापडला. हा मेथाक्युलॉन त्याने ओग्बोना पॉल या नायजेरियन व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडे पासपोर्ट व व्हिसा नसल्याचेही समजले. बोनिफेस ईमेनीके याला ठाणे पोलिसांनी मुंब्रा येथून अमली पदार्थाच्या तस्करीत काही अटक केली होती. तो काही महिन्यांपूर्वीच जेलमधून सुटून आला होता.
Tags
क्राईम न्यूज