प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - बांबवडे येथे गुरुवार हा बाजारा दिवस.आसपासच्या गावातील लोक तेथे बाजाराला जातात.त्यात महिलांची संख्या जास्त असते .त्यातच सरकारने महिलांना 50% तिकीटात सवलत असल्यामुळे एसटी मध्ये महीलांची गर्दी अधिक असल्या कारणाने महिला चोर या गर्दीचा फायदा घेऊन एसटी मध्ये चढ़ून चोरी करून निघुन जातात.
असाच प्रकार कोल्हापूर ते मलकापूर जनता गाडी मध्ये घडला.नावली देवाळे मार्गावर एसटी आली असता एका महीलेचे गळ्यातील नसल्याचे समजले त्या महीलेने तात्काळ कंडक्टरला सांगीतले ,अन्य प्रवाशांचे कोणाचें मोबाईल,तर कोणाचे पाकीट लंपास झाले होते.हे समजताच ड्रायव्हरनेएसटी बांबवडे बस स्थानकांत आणून तेथे असलेल्या वहातुक नियंत्रकाला सांगीतले .
वहातुक नियंत्रक राकेश कांबळे यांनी तात्काळ शाहूवाडी पोलिसात जाऊन तक्रार देऊन पोलिस घटना स्थळी येऊन एसटी मध्ये जाऊन झाडाझडती घेऊन संशयीत पाच महीलांना आणि चार पुरुषांना अटक करून त्याच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी एसटीचे वाहक ,चालक आणि वाहतूकनियंत्रण कक्षाचे वहातुक नियंत्रक राकेश कांबळे यांच्यासह बांबवडे ,शाहूवाडी पोलिसांचे कौतुक होत आहे. प्रत्येक प्रवाशांनी खबरदारी घेण्याचे पोलिसा कडुन आवाहन करण्यात आले.कोल्हापुरातही चोरी करणारया महीला गर्दीच्या ठिकाणी दिसून येतात .टाऊन हॉल ,दसरा चौक बस स्टॉप ,एसटी स्टँड आदी इतर ठिकाणी दीसून येतात.त्या महिला बस किंवा एसटीत चढ़ल्यागत करायचे आणि हाथ साफ करून खाली उतरायचे अशी त्याची पध्दत असते.