प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूरातुन मुंबई कडे जाणारया पुणे बंगलोर महामार्गावर नर्हे आंबेगाव जवळ रविवारी पहाटे खाजगी बस आणि ट्रक च्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला.तर सहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे
.मृत व्यक्ती मुंबईला नोकरीस असल्याचे समजते.ते पत्नीसह दोन मुली सह मुंबईत राहत होते.त्यांनी नुकतेच घर घेतले होते.ते आपल्या आईला दाखवण्यासाठी खाजगी बसने जात होते.रविवारी पहाटेच्या सुमारास नर्हे आंबेगावा जवळ बस ला पाठीमागुन ट्रकने जोरदार धडक दिली.या धडकेत स्लीपर कोचावर मागच्या बाजूस झोपलेल्या माय लेकरांचा जागीच मृत्यू झाला.रविवारी सकाळी अपघाताचे वृत्त समजताच मृताचे नातेवाईक पुण्याला रवाना झाले.रात्री उशिरा मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.