महाराष्ट्र शुश्रुषागृह कायद्याच्या अंलबजावणीसाठी शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांना निवेदन

डॉक्टर आणि रुग्णांमध्ये होणारे वाद विवाद टाळण्यासाठी संवादाच्या माध्यमातून प्रयत्नशील - अपना वतन संघटना

प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी चिचंवड शहरातील खाजगी व धर्मादाय रुग्णालयाच्या ,माध्यमातून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ . तानाजी सावंत यांची भेट घेऊन  निवेदन दिले होते . तसेच रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र शुश्रुषागृह ( सुधारित )  नियम २०२१ प्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिचंवड पालिका आयुक्त व वैद्यकीय विभाग यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले होते.

  पिंपरी चिचंवड शहरातील सर्व खाजगी व धर्मदाय रुग्णालयांमधील डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना आज संघटनेचे निवेदन व  महाराष्ट्र शुश्रुषागृह कायद्याची प्रत देण्यात आली . व सर्व वैद्यकीय कायद्यांचे पालन करून रुग्णांना चांगली सुविधा द्यावी अशी विनंती केली. एक भारतीय नागरिक म्हणून आपण इतर सर्व भारतीय बांधवांची सेवा करावी . डॉक्टर हि पदवी व्यवसायासाठी किंवा केवळ आर्थिक फायद्यासाठी नसून एक मोठी सेवा आहे. त्यामुळेच डॉक्टरांना देव म्हणतात . त्यामुळे आपापल्या रुग्णालयांमध्ये कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी जेणेकरून संघर्ष उदभवणार नाही .अशी भूमिका अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिकभाई शेख यांनी मांडली . डॉक्टरांनी या भूमिकेचे स्वागत केले व संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . यावेळेस फिनिक्स हॉस्पिटल , काळेवाडी फाटा , ग्लोबल हॉस्पिटल , अपेक्स हॉस्पिटल याठिकाणी भेट देण्यात आली . 

यावेळी संघटनेचे आतिक अत्तार , प्रकाश पठारे , रियाज शेख आदीजण उपस्थित होते. 


Post a Comment

Previous Post Next Post