प्रेस मीडिया लाईव्ह :
शनि दि. 25 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता अमृतनगर श्री. स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र आणि अमृत नगर जेष्ठ नागरिक असोसिएशन या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त या मठाच्या सातवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला .
स्वामी मठाच्या सेवेकरी सदस्य संस्थापक विश्वस्त तसेच विभागीय जेष्ठ नागरिकांमधून ज्यांच्या जन्मदिनास सत्तरहून अधिक वयवर्ष पूर्तता आणि ज्यांच्या लग्न सोहळ्यास पन्नास हून अधिक वर्षपूर्ती झाली ,त्या ज्येष्ठांचा, व्यक्तीमत्त्वांचा व उभयतांचा मानपत्र ,शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तद्प्रसंगी मान्यवर श्रीम. सुनीताताई शिंदे (उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) श्री शिवाजी फुलसुंदर (दूरदर्शन मा. संचालक/ निर्माता), श्री. विष्णू पाचपुते (सह आयुक्त विक्रीकर), सुप्रसिद्ध निवेदिका पूर्णिमा शिंदे, विनोद सिनकर (विश्वस्त मातोश्री सेवाधाम ट्रस्ट) ओरिएंटल इन्शुरन्स अधिकारी सौ. मीनल खांडगे इ. मान्यवर उपस्थित होते. अध्यात्मिक केंद्राचे अध्यक्ष इस्माईल पटेल, चार दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त श्री रविंद्र पाचपुते यांनी केले.
अध्यात्म केंद्रातर्फे मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलेल्या सन्मान मूर्तींना 51 दीप प्रज्वलनाने सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे मानकरी असलेल्या स्वामी सेवेकरींना आणि ज्येष्ठांना 81 दीपप्रज्वलनाने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते औक्षण करण्यात आले .तद्प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वर्धापनदिन स्मरणिका प्रकाशनही करण्यात आले. अध्यात्मिक सेवा नामस्मरण ,महाआरती, अभिषेक, भंडारा ,अन्नदान प्रसादवाटप करण्यात आले विभागीय असंख्य नागरिकांनी याचा लाभ घेतला.
हा चार दिवसीय अध्यात्मिक सोहळा संपन्न होत असताना अध्यक्ष इस्माईल पटेल, सरचिटणीस श्री रवींद्र पाचपुते ,खजिनदार श्री गोरखनाथ गोसावी, उपाध्यक्ष श्री जगन्नाथ बुटाले केंद्र संस्थापिका शैला पाचपुते, अध्यक्षा जयश्री देसाई, उपाध्यक्ष राजश्री कोल्हे, चिटणीस विजय चिखलकर या विश्वस्तांसह ललिता राव, सविता सापस्टेकर, सानिका हांडे, सारिका सावंत, अशोक मोरे, शंकर फदाले, पुरुषोत्तम ठाकुर, रंजना खुुटाळ, श्री. घुगे, विजया चिखलकर, अमृता, सायली ,शुभांगी महाडिक, विजू नाईकडे, प्रतीक पाचपुते राहुल भाई, जमील भाई आदी स्वामी सेवेकरींनी स्वामी प्रकट दिनापासून सतत चार दिवस मोलाचे सहकार्य लाभले; आणि सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.
Tags
महाराष्ट्र