इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपकडून चौकशीची मागणी
५ एप्रिल रोजी सर्व संबंधित अधिकारी, कार्यालये ,परिमंडळ , क्षेत्रीय कार्यालये यांची बैठक
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पालिका हद्दीतील दहनभूमी तसेच दफनभूमी करीता एकाही संस्थेस अथवा व्यक्तीस दहनभूमी तथा दफनभूमी करीता निगराणी, देखरेख तसेच दहनाचा, दफन करण्याकरीता पैसे घेण्याबाबत कागदोपत्री अधिकार दिलेला नाही. तरीही यासंबंधी टेंडर काढले जात असेल तर तो निधी कुठे खर्च होतो, ते पालिकेने जाहीर करावे, अशी मागणी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम बागवान यांनी पत्रकाद्वारे केली होती. त्यानंतर त्यांनी मागण्यांचे पत्र घेऊन अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांची भेट घेतली. या विषयासंबंधी ५ एप्रिल रोजी सर्व संबंधित अधिकारी,कार्यालये,परिमंडळ,क्षेत्रीय कार्यालये यांची बैठक पालिकेने बोलावली आहे.
या बाबत चौकशी करीता अतीरिक्त आयुक्त कुणाल खेमनार ,विशेष अतीरिक्त आयुक्त बिनवडे यांनी पंधरा क्षेत्रीय कार्यालय चे सह उप आयुक्त,पाच परीमंडळे यांचे उप आयुक्त तसेच संबधित विभागाचे उप आयुक्त, अधिकारी यांची विशेष बैठक घेवून या विषयावर तोडगा काढण्याकरीता आयोजित केली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी कल्पना बळीवंत यांनी इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांना दिली.
निरुत्तरित प्रश्नमालिका ....
दहनभूमी तसेच दफनभूमी तील व्यवस्थांकरिता पालिकेच्या मालमत्ता विभाग,भवन विभाग,बांधकाम विभाग,सुरक्षा विभाग,आरोग्य विभाग ,परिमंडळ आणि क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यासंदर्भात इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप चे असलम बागवान यांनी पालिकेला पुढील प्रश्न विचारले आहेत . या प्रश्नाची उत्तरे पालिकेकडे नाहीत .
१) दहन आणि दफन करीता मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना किती अर्थ साहृय प्राप्त होते.
२) दफनभूमीत खड्डे खोदण्याकरीता तसेच दहन भूमीत सरपण रचणार्यास पैसे कोणी द्यायचे व किती.
३)खड्डे खोदने अथवा सरपण रचनारा व्यक्ती पुणे महानगरपालिका यांचा अधिकृत व्यक्ती आहे का?
४)सूरक्षा रक्षकांची कर्तव्ये काय?
५) सामाजिक संस्था अथवा व्यक्ती यास पुणे महानगरपालिका यांनी येथील कारभार पाहण्याची लेखी सूचना अथवा परवाना किंवा करारनामा केलेला आहे का ?
६) अतिक्रमण तथा अनधिकृत बांधकामाची सुचना देण्याची जवाबदारी कोणावर.
७) अतिक्रमण तथा अनधिकृत बांधकामाबाबत नोटिस अथवा कारवाई करण्यात आलेली आहे का?
८) सुरक्षा रक्षकांच्या नोंदी,हजेरी,तथा कर्तव्य याच जवाबदार कोण.
९) दहन दफन भूमी ची निविदा काढण्याचा तसेच तो संमत करण्याचा आधिकार कोणाला.
१०) वार्षिक बजेटमधिल दहन दफन भूमी च्या तरतूदी अंमलात आणण्यासाठी जवाबदारी कोणाची.
या सर्व प्रश्नांची उत्तरे आज पर्यंत निरूत्तर असल्याने येथे मोठा भष्टाचार होतोय .राजकिय पुढारी,माजी नगरसेवक तसेच पालीका अधिकारीहि यात सामील आहेत हेच निष्कर्ष निघत असून याची सखोल चौकशी व्हावी तसेच सामान्य नागरिकांना त्यांचा मरणोप्रणांत आधिकार मिळावा हिच अपेक्षा आहे,असे असलम बागवान यांनी म्हटले आहे.
टेंडरची रक्कम नेमकी कशी खर्च होते, याबद्दल १५ क्षेत्रीय कार्यालयास माहिती नाही .इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप च्या दोन वर्षाच्या पाठपुराव्यामुळे हा मोठा भ्रष्टाचार उघड होत आहे.पुणे महानगरपालिका,महापालिकेचे परीमंडळ, क्षेत्रीय कार्यालय तसेच आरोग्य उप आयुक्त, आरोग्य आधिकारी, स्वतः आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे याबाबत माहिती उपलब्ध नाही, असे बागवान यांनी सांगितले.
टेंडरची रक्कम नेमकी कोठे खर्ची पडते. सुरक्षा कर्मचारी ठेकेदार पध्दतीने आहे तरी सफाई आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी करतात. तर ठेकेदारा कडील सुरक्षा रक्षक मनपाचा पगार ठेकेदाराकडून घेवून कमी पैशात दुसरा कर्मचारी नियुक्त करतो आहे.दहनभूमीत सरपण रचणारा तथा दफनभूमीत खड्डे खोदणारा याच्या नोंदी मनपा तथा क्षेत्रीय कार्यालये कडे उपलब्ध नाहीत. तोतया संस्था,अथवा तोतया व्यक्ती या ठिकाणी अनधिकृत बांधकामे, प्रार्थनास्थळे राजरोस पणे बांधून तेथे ट्रस्ट निर्माण करून विविध कारणाने नागरीकांकडून पैसे उकळतात. यास जबाबदार कोण प्रभागातील मान्यवर की महानगरपालिका ? की दोघांचे संगनमत ? या प्रश्नाची उत्तरे मनपा आयुक्त,अतिरिक्त आयुक्त, आरोग्य उप आयुक्त तथा संबधित सर्व अधिकारी यांच्याकडे नाहीत. मग येथील कारभार कशाच्या पाठबळाने चालू आहे असा प्रश्न असलम इसाक बागवान यांनी उपस्थित केला आहे.
मनपा जागेवर अतिक्रमण,जबरण ताबा,पैशाची वसूली तथा नागरीकांची दिशाभूल यावर पुणे महानगरपालिका गुन्हे दाखल करणार की राजकिय दबावाखाली फक्त सामान्य नागरिकांना वेठिस धरणार हा मोठा प्रश्न आहे.सध्या प्रशासकिय राजवट असूनही येथे मान्यवरांचीच चलती आहे या शिवाय पुण्यातील बहुतांश मालमत्ता राजकीय पुढार्याच्याच ताब्यात आसून करोडोंचा महसूल बुडवला जात आहे. यास जवाबदार कोण? असाही प्रश्न बागवान यांनी विचारला आहे.
या मालमत्ता तसेच दहन, दफनभूमी येथील तोतया संस्था तसेच व्यक्ती वर त्वरीत गुन्हा नोंद करून सामान्य जनतेस मिळणारे त्यांचे हक्क स्थानिक स्वराज्य संस्थेने त्वरीत बहाल करावेत, तसेच कोंढवा खुर्द येथील स न ४४.४५.४६ येथील मनपा ताब्यात असणारी रिकामी जागा त्वरीत दफनभूमी करीता उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी पत्रकाद्वारे केली आहे.