प्रेस मीडिया लाईव्ह :
भाजप सरकारच्या विरोधात लोणावळा शहरात कॉंग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करत भाजपाचा व मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर, मावळ तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, माजी अध्यक्ष दिलीप ढमाले, संभाजी राक्षे, लोणावळा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी नगरसेवक सुधिर शिर्के, महिला शहराध्यक्षा पुष्पा भोकसे, रोहिदास वाळुंज, राजु गवळी, मंगेश बालगुडे, महंमद मणिय्यार, सर्फराज शेख, भरत खंडेलवाल, पप्पू लोखंडे, निखिल तिकोणे, आकाश परदेशी आदीसह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते
2019 साली कर्नाटक विधानसभा निवडणुकी दरम्यान राहुल गांधी यांनी मोदी आडनावा बाबत एक विधान केले होते. ज्याचा निकाल देताना सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. भारत जोडो अभियान राबवत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी देशभर फिरत आहेत. त्यांना सर्व ठिकाणी मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली असून विरोधकांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र भाजपा व केंद्रातील मोदी सरकार करत असल्याचा आरोप या आंदोलनात कॉंग्रेस नेत्यांनी केला.