अध्यक्षा आशा कदम यांच्या कडून जाहिर.
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
माथेरान : - मागील महिन्यात माथेरान मधील स्थानिक अश्वपाल संघटना,मूलनिवासी अश्वपाल संघटना तसेच मालवाहू संघटना यांनी सात पॉईंट सर्कल रस्त्यावरही तीव्र उताराच्या रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक काढण्याच्या मागणीसाठी सहा दिवस घोडे बंद आंदोलन केले होते.
त्यावेळी माथेरान गावातील कोणत्याही राजकीय पक्षानी पाठिंबा दिला नव्हता. तर पेव्हर ब्लॉक व ई रिक्षा संदर्भात मारिया वॉझ व माथेरान मधिल तिन्ही आश्वपाल संघटनेकडून मा.सुप्रिम कोर्टात दाखल याचिकानुसार देण्यात आलेल्या स्टे प्रमाणे पेव्हर ब्लॉकचे रस्त्यांचे काम थांबले आहे. थांबविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक व बंद झालेल्या ई रिक्षा सुरु ठेवण्यासाठी माथेरान पर्यावरण संवेदनशील फोरम कडून मोर्चा काढला जाणार आहे. मात्र त्या मोर्चाला माथेरान मधील स्थानिक अश्वपाल संघटना यांचा कोणताही पाठिंबा नाही असे पत्रक अश्वपाल संघटनेच्या वतीने पोलिसांना दिले आहे. तर माथेरान बंद व मोर्चा मध्ये हि संघटना सहभागी होणार नाही. माथेरान मधील अश्वपाल नेहमीप्रमाणे घोडे पर्यटकांच्या दिमतीला असतील असे संघटनेच्या अध्यक्ष आशा कदम यांनी जाहीर केले आहे.