प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे- येरवडा परिसरातील महिलांसाठी महिला दिनानिमित्त 'मुद्रा लोन' बिनव्याजी व्यवसायिक कर्ज कसे मिळते, कोणकोणती कागदपत्रे लागतात या विषयाचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नुष्का ग्रुप च्या संस्थापिका सौ. प्रीती शिरीष काकडे व डॉ. शिरीष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी पक्षाच्या येरवडा भागातील इच्छुक उमेदवार श्रद्धा मनोज शेट्टी यांनी केले होते
शासनाच्या विविध प्रकारच्या योजना या सामान्य नागरिकांच्या विकासासाठी योजलेले असतात मात्र त्या योजनांची माहिती नसल्याने त्या योजनांचा लाभ महिलांना घेता येत. त्यामुळे मुद्रा लोन ची माहिती मिळाल्याने महिलांच्या उद्योग व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी किंवा चालू व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे असे आम आदमी पक्षाचे मनोजशेट्टी यांनी सांगितले*
या शिबिरास महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला. अशा प्रकारचे शिबीर यापुढेही घेण्याचे महिलांनी आग्रह धरला