सरकारच्या नाकार्तेपणा विरोधात लोकांनी कसब्यात मतदान केलं. प्रकाश आंबेडकर



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत  सर्व राजकीय नेत्यांची झोप उडाली होती अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. रवींद्र धंगेकर हे ११ हजार मतांनी विजयी ठरले .रवींद्र धंगेकर यांचा विजय हा विरोधकांच्या  झोपा उडविणारा ठरला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला , या निकाला नंतर  राजकीय वर्तुळातून जोरदार चर्चा  अजूनही सुरू आहे   या निकालावर वंजित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुळात हा निकाल सरकारच्या विरोधात आहे. सरकारच्या नाकार्तेपणा विरोधात लोकांनी कसब्यात मतदान केलं. पिंपरी चिंचवडमध्येही जनमत हे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असल्याचं दिसून आलं", अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post