प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ/प्रतिनिधी:
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दत्तवाड व कवठेगुलंद येथे सच्छिद्र मुख्य पाईपलाईन बसविणे कामाला सुरुवात आली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव (दादा) पाटील यांच्या हस्ते दत्तवाड मधील कोटलिंग भागातील सुमारे 100 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा शुभारंभ झाला.
सच्छिद्र पाईपलाइन संदर्भात सर्वतोपरी सहकार्य आणि अचूक मार्गदर्शन करण्याची ग्वाही गणपतराव पाटील यांनी दिली. शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून उत्पादन वाढ करावी तसेच सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असे सांगून सर्व शेतकरी बंधूंना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. समन्वयक चंद्रशेखर कलगी यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.
यावेळी शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, शक्तीजित गुरव, दत्तवाडचे तंटामुक्त अध्यक्ष सुरेश पाटील, रावसो पाटील, सुधाकर गळतगे, जयपाल नेजे, कुमार आडे, मलगोंडा पाटील, राजू गुमटे, बाबासो नागराळे, सुरेश बाळगोण्णावर, प्रणव पाटील, प्रविण सुरवंशी तसेच सर्व शेतकरी उपस्थित होते.
कवठेगुलंद येथेही पहिल्या टप्प्यातील 150 एकरावर मुख्य पाईपलाईन बसवून क्षारपड मुक्तीच्या कामाला धार्मिक विधी व श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, संचालक भैय्यासो पाटील, सरपंच प्रमिला जगताप, उपसरपंच गुरुपाद केटकाळे, अविनाश कदम, ऋतुराज शिंदे, अशोक पाटील, रावसाहेब पाटील, जगन्नाथ कदम, मानसिंग शिंदे, विनोद जगताप, रामचंद्र तांबिरे, सुरेश कांबळे, चंद्रशेखर मगदूम, नंदकुमार शिंदे, बाळासो पाटील, नामदेव आंबी, वसंत कुम्मे, अशोक कदम आदी शेतकरी उपस्थित होते.