प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरढोण प्रतिनिधी :
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संपादक पत्रकारांचा आज सन्मान होत आहे. समाज व शासन यांचा दुवा साधणारे पोलीस व पत्रकार आहेत. सामाजिक बांधिलकीतून अन्याय होत आहे तेथे आवाज उठवण्याचे काम करीत आहेत. निर्भीड सडेतोड लिखाण करून समाजाला न्याय मिळवून देणारे वृत्तपत्र म्हणजे ग्रामदेवता , ग्रामदेवताचे संस्थापिका संपादक कांचनताई सखाराम जाधव, संपादक सखाराम जाधव यांचे दैनिक ग्रामदेवता वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार दिलीप कोळी यांना समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला त्याबद्दल श्री कोळी यांनी आभार मानले .
ते पुढे म्हणाले की ग्रामदेवताचे छोट्या वृत्तपत्राचे विशाल रूपांतर झाले. मोनिका जाधव उत्कृष्ट काम करीत असतात. वृत्तपत्र जेष्ठ नागरीक, तरुण, मुले, महिला आवडीने वाचत आहेत. डिजिटल मीडिया चॅनल वरून 36 जिल्ह्यात बातम्या जात आहेत. संपादक सखाराम जाधव बोलणं कमी व काम ज्यादा ! नम्रता विनयशीलता गुणाद्वारे सर्वांना सामावून घेऊन जात आहेत. आध्यात्मिक धार्मिक भक्ती शक्ती युक्तीचे प्रतीक आहेत. भजन कीर्तनाची आवड आहे.
वर्धापदिनानिमित्त मुंबई पुणे सिंधुदुर्ग कर्नाटक राज्यातून कोल्हापूर सोलापूर पंढरपूर इत्यादी भागात सामाजिक विधायक काम करणाऱ्यांचा शोध बोध घेऊन पुरस्कारासाठी निवड केले. त्यात कला क्रीडा शैक्षणिक पत्रकार अभिनेते , महिला दिनानिमित्त महिलांना पुरस्कार देऊन त्यांना नवसंजीवनी ऊर्जा प्रेरणा स्फूर्ती देऊन सन्मान केला. त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली छान !! वाढवली समाजाची शान!! मिळाला सह कर्तुत्वाचा मान!! म्हणूनच आज आपण क आमचा सन्मान केला !!ग्रामदेवता या वृत्तपत्राला लाख लाख शुभेच्छा असे शेवटी श्री दिलीप कोळी म्हणाले.