आंबेडकरवादी चळवळीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला निर्णय
प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ :
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरामध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जावा अशी शिरोळ तालुक्यातील आंबेडकरवादी जनतेची अनेक वर्षाची मागणी होती, 2019 ची आमदारकीची निवडणूक लढवताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर शहरात आपण छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारणार असल्याची ग्वाही शिरोळ तालुक्यातील जनतेला दिली होती, यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम जयसिंगपूर शहरात अंतिम टप्प्यात असून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जयसिंगपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी व्हावा अशी चळवळीतील कार्यकर्त्यांची आग्रही मागणी झाल्यामुळे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जयसिंगपूर शहरातील मध्यवर्ती क्रांती चौक परिसरातच उभारला जाईल असा निर्णय घेतला व त्यासाठीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली,
याबाबत शिरोळ तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीत काम करणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी रविवारी एकत्र येऊन बैठकीचे आयोजन केले होते, या बैठकीमध्ये एकमताने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली, उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजय पवार, सचिव डॉक्टर सुभाष सामंत, सहसचिव सुरेश कांबळे,खजिनदार उत्तम वाघवेकर तर निमंत्रक म्हणून अभिजीत आलासकर यांच्या निवडी या बैठकीमध्ये घोषित करण्यात आल्या, लवकरच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व्यापक शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची भेट घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीच्या कामाला तातडीने सर्व प्रकारची मदत करावी अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन सादर करणार आहेत,
या कामाचा वेगाने पाठपुरावा करण्यासंबंधीचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, बैठकीस ज्येष्ठ पत्रकार विजय पवार, बाळासाहेब कांबळे, उत्तम वाघवेकर, पत्रकार सुरेश कांबळे, पत्रकार आनंदा शिंगे, संजय शिंदे, बी. आर. कांबळे, सूर्यकांत कांबळे, डॉक्टर सुभाष सामंत, अभिजीत अलासकर, जयपाल कांबळे, अब्दुल बागवान, सुरज कांबळे,सुनिता पवार, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती सदस्यपदी ऍडव्होकेट इंद्रजीत कांबळे, ऍडव्होकेट शितल कांबळे, डॉ, चिदानंद आवळेकर, डॉ. महावीर अक्कोळे,राजेश शिंदे, सुभाष साठे,माधुरी आलासकर, प्रा. आसलम फरास,शैलेश आडके, पै. विठ्ठल मोरे, शैलेश चौगुले, राजू बनपट्टी, वासुदेव भोजणे, रजनीकांत कांबळे,डॉ.अतिक पटेल, मिलिंद भिडे, रघुनाथ देशिंगे, स्वप्निल कांबळे, गौतम कांबळे, संकेत कांबळे, सुरज शेळके, जॉन सकटे, निलेश कांबळे, हुसेन शेख, शंकर बिराजदार, राहुल कांबळे, जुलेखा मुल्लाणी सर्व राहणार जयसिंगपूर, आण्णासाहेब पाटील, केशव राऊत, पद्माकर कांबळे, गौतम कांबळे, विनोद कांबळे, हिंदुराव कांबळे, नामदेव कांबळे दानोळी, बापू कांबळे, शरद कांबळे उमळवाड, महावीर कांबळे, गौतम दिक्षांत, राजू मांजर्डेकर, विकास कांबळे चिपरी, दिलीप कांबळे, स्वाती सासणे, मल्हारी सासणे, शिवाजी कांबळे उदगांव,
सुनील कामत, प्रदीप पेटारे, नाना कांबळे कोंडीग्रे, धनपाल कांबळे, सचिन खुडे, अमोल शिंदे, संभाजी कोळी संभाजीपूर, अविनाश कांबळे, दगडू माने, दिगंबर सकट, अनिल लोंढे, राजेंद्र प्रधान, सुरज कांबळे, सुरेश पांढरे, चिदानंद कांबळे, अशोक कांबळे, संजय शिंदे, अभिजीत कांबळे, पुलकेश कांबळे शिरोळ, बाबासाहेब कडाळे, सुनील कुरुंदवाडे, धम्मपाल ढाले, अनुप मधाळे, सुचितोष कडाळे, आण्णाप्पा बंडगर, आप्पा बंडगर, अक्षय आलासे, रमेश भुजगुडे कुरुंदवाड, सचिन कांबळे, दिलीप थोरात अर्जुनवाड, जालिंदर ठोमके, तानाजी कांबळे चिंचवाड, प्रकाश कांबळे, आकाश कांबळे, सुरेश कांबळे, अबू बारगीर टाकवडे, प्रकाश कांबळे घालवाड, किरण कांबळे, प्रकाश कांबळे,सुभाष कांबळे कुटवाड, युवराज गायकवाड , विक्रम माने,तेरवाड, संदीप बिरंगे, सुशील कांबळे, हरिश्चंद्र पाटील टाकळी, उदय कांबळे, केंदवा कांबळे टाकळीवाडी, प्रमोद कांबळे, विश्वास शिंगे शिरढोण, संजय कांबळे, अमर कांबळे कनवाड, देवराय कांबळे हसुर, रमेश मोरे, रामदास भंडारे शिरटी, सेनापती भोसले, योगेश कांबळे, संजय कांबळे, रोहीत बावचे, घोसरवाड, संजय कांबळे, ऍडव्होकेट अनिरुद्ध कांबळे, अर्जुन जाधव, हेरवाड, जी. डी. चव्हाण, पारीसा कांबळे बस्तवाड, अविनाश कांबळे राजापूर, सचिन कांबळे खिद्रापूर, अनिल कुरणे, राजेंद्र कांबळे शिरदवाड, प्रा. देवानंद कांबळे,मिलिंद कुरणे, मारुती मोहिते, सुभाष चौधरी, अब्दुललाट, रमेश कांबळे, विनायक कांबळे, नरसिंहवाडी, किरण कांबळे, बिरू कांबळे, रमेश कांबळे, शरद कांबळे औरवाड, बाबालाल कांबळे, गौतम निंबाळकर, अशोक कांबळे, सुनील भोसले, भरत कांबळे गौरवाड, मल्लाप्पा चौगुले, शेखर कांबळे, राहुल कांबळे कवठेगुलंद, बसवराज कांबळे शेडशाळ, शरद कांबळे, अनिल लोंढे गणेशवाडी, जवाहर कांबळे, प्रशांत बिडकर, पोपट कोरे, अनिल कांबळे आलास, सदाशिव कदम शेडशाळ, रंगराव कांबळे, उल्हास भोसले, मोहन प्रभावळकर यड्राव, जयकुमार कांबळे, रोहित कांबळे, बाळासाहेब कांबळे हरोली, बाळासाहेब कांबळे, दीपक कांबळे, बाबासो बागडी नांदणी, राहुल कांबळे, सुशांत कांबळे, करुणा कांबळे धरणगुत्ती, डी. आर. कांबळे सुनील कांबळे तमदलगे, राहुल कांबळे, ईश्वरा धनवडे, सर्जेराव धनवडे, देवाप्पा कांबळे, उमेश सावंत, अमोल सावंत, रवी सावंत निमशिरगांव, शंकर कांबळे, चंद्रकांत कांबळे दत्तवाड, रावसाहेब कांबळे, राहुल सावंत, सुरेश कांबळे जैनापुर, बाळासाहेब कुरणे कवठेसार, संतोष आठवले, प्रशांत कांबळे, राजू कांबळे नवे दानवाड, जयपाल कांबळे, प्रशांत कांबळे जांभळी, नितीन वायदंडे ,अशोक तिवडे कोथळी, रघुनाथ कांबळे जुने दानवाड, जगन्नाथ जाधव बुबनाळ, भालचंद्र कागले, अभिजीत दत्तवाडे मजरेवाडी, प्रकाश खोत शिवनाकवाडी, पांडुरंग खोत लाटवाडी, सतीश कांबळे, अझर पट्टेकरी कनवाड, सुभाषसिंग रजपूत, अमोल चव्हाण मौजे आगर, राजाराम गोते राजापूरवाडी आदी मान्यवरांचा समावेश करण्यात आला, याशिवाय ज्यांना पुतळा समितीमध्ये काम करावयाचे आहे त्यांनी पुतळा समिती पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.