प्रेस मीडिया लाईव्ह :
साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांना इशारा दिला.साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांना इशारा दिला.सुषमा अंधारे यांनी भाजपला लक्ष्य केलं. त्या म्हणाल्या, "ज्यांच्यावर कारवाया सुरू आहेत, ते बिगर भाजपचे आहेत. 98 टक्के लोक बिगर भाजपचे आहेत. ज्या 2 टक्के भाजपशी संबंधित लोकांवर कारवाई होतेय, त्यांची उपयोगिता संपली असेल. जे भाजपमध्ये जातात, त्यांच्यावरच्या कारवाया बंद होतात .
"सुषमा अंधारे म्हणाल्या, " किरीट सोमय्या यांचे मुळे भाजपचं सरकार स्थापन झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण किरीट सोमय्या राजकारणी कमी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते जास्त आहेत. त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केला होता. त्यांनी 22 पत्रकार परिषदा घेतल्या आणि 55 ट्विट केले. आनंद आडसुळ यांच्याबद्दल 6 पत्रकार परिषदा आणि 20 ट्विट केले. भावना गवळींविरोधात 8 पत्रकार परिषदा घेतल्या आणि 224 ट्विट केले."
"यशवंत जाधवांविरोधात त्यांनी 16 पत्रकार परिषदा घेतल्या. अर्जून खोतकरांसाठी त्यांनी 9 पत्रकार परिषदा घेतल्या. सदानंद कदम प्रकरणात किरीट सोमय्यांनी खेड, दापोलीला 11 वेळा भेटी दिल्या. किरीट सोमय्या कोण आहेत.? ईडीचे कर्मचारी आहेत का..? सोमय्यांनी अनिल परबांसाठी 245 ट्विट केले आणि 45 पत्रकार परिषदा घेतल्या", अशी माहिती अंधारेंनी दिली . सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांची आकडेवारीच मांडली. भावना गवळी, यशवंत जाधव, अर्जून खोतकर, नारायण राणे, प्रताप सरनाईक यांच्याबद्दल केलेल्या आरोपांचा लेखाजोखाच वाचून दाखवला. या लोकांवर किरीट सोमय्यांनी आरोप केले, मात्र हे लोक भाजपमध्ये गेल्यानंतर या प्रकरणाचं काय झालं..?
किरीट सोमय्यांना कागदपत्रे आधीच कशी मिळतात..?
किरीट सोमय्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गाळा हडप केल्याचा आरोप केलेला आहे. याच प्रकरणात सोमय्यांनी काही ट्विट केले होते. त्यावर सुषमा अंधारेंनी बोट ठेवलं. जी कागदपत्रे किशोरी पेडणेकर यांना मिळाली, त्याच्या आधीच ती सोमय्यांनी ट्विट केली, महत्त्वाचं म्हणजे सही होण्याआधीच त्यांनी हे केलं, मग ही कागदपत्रे त्यांना कशी मिळतात? हसन मुश्रीफ प्रकरणातही त्यांना आधीच कागदपत्रे मिळाली. याची न्यायालयानेही दखल घेण्याची गरज असल्याचं आणि सोमय्यांना ही कागदपत्रे कशी मिळतात याबद्दल केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.