प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रसायनितील जय प्रिसिजन कंपनी विरोधातील धरणे आंदोलनाबाबत कामगार आयुक्तांशी चर्चा धरणे आंदोलनाच्या विविध मागण्या मान्य स्थानिक कामगारांच्या न्याय हक्कासाठी जय प्रिसिजन कंपनीच्या विरोधात खालापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष कृष्णा पारंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी गेट जवळ धरणे नुकताच आंदोलन करण्यात आले
याबाबत स्थानिक संघटनांनी या धरणे आंदोलनास पाठिंबा दिला असून कामगार आयुक्त पनवेल यांच्याकडे कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कामगार आयुक्त समीर चव्हाण व शितल कुलकर्णी यांच्या समोर कंपनी व्यवस्थापन व कामगार यात चर्चा करण्यात आली.
या मध्ये महिलांना रात्री 11 वाजता ड्युटी संपल्यानंतर घरापासून लांब रस्त्यावर सोडले जाते. या विषयावर कंपनीत काम करत असताना घर ते कंपनी पूर्णपणे जबाबदारी कंपनीची असणार आहे. तसेच स्थानिक कामगारांना ट्रान्सफर ऑर्डर काढून घरी बसविण्यात येत होते. आता ते कंपनीला करता येणार नाही.
8 तास ड्युटीनंतर कार्ड आउट करतात परंतु नंतर 2 ते 3 तास विना मोबदला काम करावे लागत होते, त्याचा मोबदला देण्यात येणार आहे.
याबाबत कामगार आयुक्तांशी कामगारांच्या हितासाठी चर्चा चालू असून लवकरच सर्व कामगारांना न्याय मिळेल असे खालापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष कृष्णा पारंगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.