राजिप पाले शाळेत भरला आनंद बाजार



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

उरण तालुक्यातील एक छोटी शाळा परंतु ही शाळा नेहमीच चर्चेत असते याच एक मेव कारण म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक उपेंद्र ठाकूर,उपशिक्षिका पुष्पलता म्हात्रे, ह्याची तळमळ सोबत शाळा व्यवस्थापन कमिटी च सहकार्य ,या पाले शाळेला गणिताचं गाव म्हणून चर्चा आहे त्यात आज सर्वांच्या सहकार्याने मुलांना लहान वयात व्यवसायिक ज्ञान मिळावं आणि सहज आकडे मोड करता यावी यासाठी आनंदबाजाराचे आयोजन करण्यात आलं आहे यावेळी 

आवरे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच   समाधान म्हात्रे, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन च्या उरण तालुका प्रमुख रणिता ठाकूर, शाळेचे मुख्याध्यापक उपेंद्र ठाकूर, पुष्पलता म्हात्रे, सारडे विकास मंचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे शाळेय व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामस्थ महिला तसेच तरुण वर्ग मोठ्या संघेन उपस्थित होते

या आठवडा बाजारात ज्या प्रमाणे आपल्या दैंनंदिन जिवनात जसा बाजार भरला जातो तसाच काहीसा देखावा आज पहायला मिळाला या बाजारात शेव पुरी, चिकन पुरी , चिकन भाकरी ,कपडे, लिंबू सरबत , वडा पाव ,इडली असे विवीध प्रकारचे  दुकान विद्यार्थ्यांनी माडली होती ,यावेळी गावातील महिला तरुण ग्रामस्थ सर्वांनी या राजिप शाळा पाले च्या आठवडा बाजारात आपली खरेदी करून मुलांना शिक्षण सोबत आर्थिक व्यवहार कसा करता यावा यासाठी सर्वांनी मोलाचं सहकार्य दिले , या आनंद बाजारात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे  शाळेचे मुख्याध्यापक उपेंद्र ठाकूर , पुष्पलता म्हात्रे यांनी आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post