प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
(कर्जत) रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याला गेल्याच आठवडयात अवकाली पावसाने झोडपले. या पावसामुळे शेतकऱ्याचे उभे पीक भिजुन कुजले तर कोणाचा अम्ब्याचा मोहोर गळुन गेला. यात राहिलेली कसर आता कर्जतचे म.रा.वि.वि. कंपनी चे उप कार्यकारी अभियंता देवके पार पाडताना दिसत आहेत.
म.रा.वि.वि.कंपनी ने शेतकर्यांना वीज बिला सोबत सात दिवसात बिल न भरल्यास कुठली ही सुचना न देता वीज पुरवठा खंडित करण्याची नोटिस बजावली आहे. काही फलोत्पादक शेतकरी त्यामुळ बुचकाल्यात सापडले आहेत. काही शेत्कार्यन्नी व्याजी पैसे घेउन बील भरण्याची व्यवस्था केली मात्र काही आत्महत्या करण्याच्या वाटेवर असू शकतात.
म.रा.वि.वि. कंपनी चे अधिकारी अगदी स्वताला ईस्ट इंडिया कंपनी चे अधिकारी असल्या सारखे वागत आहेत. शनिवार रविवार सारखे सुट्टी च्या दिवशी सुद्धा शेतकरी जेथे असेल तेथे बांधावर अथवा रस्त्यावर त्यांना गाठून त्यांच्या लाइन मेन मार्फत शेतकर्यांच्या हातात नोटिस देत आहेत. जे नोटिस स्वीकृत नाही त्यांना रजिस्टर पोस्टाने नोटिस पाठवत आहेत. कुठलीही दया माया अथवा पार्ट पेमेंट चा पर्याय दिला जात नाही. शेतकऱ्यांन दाद मागावी तर कोणाकडे ? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. या राज्यात शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही असे सर्वांना पोरके झाल्या सारखे वाटू लागले आहे.
यावर मन भरले नसेल तर ज्यांनी बिल भरले आहे त्यांना शेतीच्या मीटर मधून घरघुती वापर केला म्हणून वाढीव बिल भरण्याची नोटिस पण पाठवली जात आहे. मात्र अशा शेतकऱ्यांना अनेक पैसे भरून मागणी करुन सुद्धा घरगुती वापरा साठी स्वतंत्र मीटर दिला जात नाही. म्हणजे एकीकडे म.रा.वि.वि. कंपनी स्वता शेतकऱ्यांना विजेचा गैरवापर करण्यास भाग पाडत आहे आणि दूसरी कड़े दंड वसूली करीत आहेत. यामुळे कर्जत तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतके प्रगतिशील फलोत्पादक शेतकरी सुद्धा म.रा. वि. वि. कंपनी च्या जाचाला कंटाळून शेती सोडण्याच्या मार्गावर आहेत. अशीच एकंदर परिस्थिति राहिल्यास महाराष्ट्रा ला भविष्यात शेतमाला साठी शेजारील राज्यांवर अवलंबून रहावे लागू शकते.