प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रसायनी - येथील बिंग गुड फाउंडेशनच्या अध्यक्षा वैजयंती ठाकूर यांना गर्जा महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. 'बिईंग गुड, चांगल बनुया' हा संदेश आणि उद्दिष्टे देऊन समाजात सामाजिक कार्य करणा-या वैजयंती ठाकूर यांचे उल्लेखनीय कार्य असून यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
या व्यतिरीक्त गरजूंना मदत, कोरोना काळात स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांकरिता उपलब्ध करून दिलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी सहकार्य करणा-या वैजयंती ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य असते. यावेळी बिंग गुड फाउंडेशनच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गर्जा महाराष्ट्र हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.