श्रीवर्धनमध्ये अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांकडून गुटखा विक्रेत्यावर कारवाई
पान टपरी वाले यांना गुटखा पुरवठा करणारा हा इसम कोण आहे ? याचं नाव का उघडकीस होत नाही ? अधिकाऱ्यांचे काही संबंध आहेत का ? असा सवाल जनतेतून होत आहे
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
श्रीवर्धन तालुक्यात अवैध गुटखा विक्री चालू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन अधिकारी पेण यांना मिळाली होती. त्याप्रमाणे दिनांक १५/३/२०२३ रोजी ११.४० वाजता भारत पेट्रोल पंपाजवळील स्मित जनरल स्टोअर, इंडियन पेट्रोल पंपाजवळील उझि ब्रेक टाईम, श्रीवर्धन एस. टी स्टॅन्ड जवळ समर्थ कृपा पान शॉप येथे धाड टाकले
शासनाने विक्री करण्यास व बाळगण्याचा प्रतिबंध केलेला व अन्नसुरक्षा व मानदे अधिनियम २००६ अन्वये मधील अधिसूचनेत टी. प्रतिबंध केलेला श्रीवर्धनमध्ये अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांकडून गुटखा विक्रेत्यांवर कारवाई तसेच सदर पदार्थाचे घातक परिणाम निर्माण होऊन धोका निर्माण होईल हे माहीत असताना सुगंधी गुटखा व पानमसाला विक्रीसाठी साठवणूक करताना दिसून आले. यामध्ये संदेश शांताराम शिर्के अराठी, सोहेल अब्दुल सत्तार अराई अराठी, महेंद्र बाबल्या, रसाळ मेटकरणी यांच्यावर श्रीवर्धन पो. स्टे गु. रं. न ००४९ / २०२३ भा.दं.वी. क १८८.२७२.२७३.३२८.३४. अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलमप्रमाणे नोंद करण्यात आला असून प्रकरणाची माहिती सचिन रामलिंग आढाव अन्नसुरक्षा अधिकारी यांनी पोहवा ९०९ डी.सी. सरकटे श्रीवर्धन पोलीस स्टेशन यांच्याकडे दिली. सदर घटनास्थळाची पाहणी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याकडून करण्यात आली असून सदरील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रसेडे करीत आहेत.