कर्जत येथील डी मार्ट व्यवस्थापक विरुद्ध कर्जत पोलिसांना दिले निवेदन

 धर्मा बद्दल आकस धरल्याचा  ठेवला ठपका

प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :

     कर्जत येथील किरवली जवळ असलेल्या डी मार्ट मधील व्यवस्थापकाने चक्क कामगारांना कोणत्याही प्रकारचा टिळा न लावता येण्याचा फतवा काढला आहे. ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी युवासेनेचे संदीप बडेकर यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे . 

     



 मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत जवळ असलेल्या डी मार्ट मध्ये व्यवस्थापक राजेंद्र चव्हाण आणि राजेंद्र सावंत यांनी हिंदू धर्माचे प्रतिक असलेल्या गंध अथवा कुंकवाच्या टिळयाला न लावण्याचा तोंडी फर्मान सोडलं आहे. कुंकु लावला असल्यास तो डी मार्ट मध्ये येण्या अगोदर पुसून या असा तोंडी फतवा काढल्याने डी मार्ट मध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये असंतोष आहे. यामुळे सरळ- सरळ हिंदू लोकांवर अन्याय करण्यासारखा आहे आणि जातीवाद निर्माण करण्यासारखा आहे. सदर बाबतीमध्ये त्यांच्या कडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सांगण्यात आले .            

  या बाबत कामगार अभिजित बोराडे यांनी तक्रार केल्यानंतर युवासेना विधानसभा अधिकारी, कर्जत खालापूर संदीप बडेकर, हालीवली ग्रामपंचायत उपसरपंच केतन संभाजी बोराडे,सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत तालुका अध्यक्ष सुधिर सुरेश साळोखे,शुभम बोराडे, संदेश काळभोर, अजय बोराडे, रुपेश बोराडे, रुपेश म्हसकर, कुणाल बोराडे, सुधिर बडेकर आदी लोकांनी कर्जत पोलिस स्थानकात जात सदर व्यवस्थापकांना समज देण्याची अथवा कारवाई करण्याची मागणी निवेदन देत केली.

Post a Comment

Previous Post Next Post