रायगड जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2021 : लेखी परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांना सुचना ..



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

रायगड जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2021 च्या लेखी परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या 58 उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार, दिनांक 26/03/2023 रोजी खालील नमुद ठिकाणी घेण्यात येणार आहे.


तरी लेखी परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या 58 उमदेवारांनी खालील नमुद ठिकाणी रविवार, दिनांक 26/03/2023 रोजी सकाळी ठिक 06.30 वाजता ) महाआयटी विभागाकडील लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र 2) या कार्यालयाकडून दिलेले प्रवेश पत्र 3) ओळखपत्र (आधार कार्ड, पैन कार्ड मतदान कार्ड, वाहन परवाना) 4) 2 पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थित राहावे. उमेदवार लेखी परीक्षेकरीता दिलेल्या दिनांकास गैरहजर राहिल्यास त्यांची लेखी परीक्षा परत घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. लेखी परीक्षेकरीता पेंड व काळया शाईचे बॉल पेन या कार्यालयाकडून पुरविण्यात येणार असल्याने उमेदवारांनी सोबत आणू नये. जर उमेदवारांना लेखी परीक्षेबाबत प्रवेश पत्र (Hall Ticket) प्राप्त झाले नाही, तर उमदेवारांनी या कार्यालयाच्या sp.migad@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर कळवावे



Post a Comment

Previous Post Next Post