वीज दरवाढी विरोधात आपचे पुण्यात आंदोलन
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता महावितरणकडून तब्बल ३७% वीज दर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. या विरोधात आज आम आदमी पार्टीने पुण्यात रास्ता पेठ येथे महावितरण कार्यालयासमोर आप महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात आज राज्यभर या विरोधात आंदोलन करण्यात आले.
काही आठवड्यांपूर्वी पुण्यात महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाच्या जनसुनवाईला केवळ आम आदमी पार्टी वगळता इतर राजकीय पक्ष गैरहजर होते. यावेळी आम आदमी पार्टी तर्फे श्रीकांत आचार्य यांनी आयोगासमोर दर वाढीला सकारण विरोध नोंदवला होता.
शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर मागच्या दोन वर्षात मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर वाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलने केली आहेत. दुसरीकडे दिल्ली मध्ये श्री अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे. तसेच नव्याने सरकार मध्ये आलेले पंजाब मधील श्री भगवंत मान सरकार ने सुद्धा दि. १ जुलै पासून ३०० युनिट घरगुती आणि शेतकऱ्यांना मोफत वीज केली आहे. या वेळेस बोलताना ‘जे दिल्ली, पंजाब या राज्यात जमते ते महाराष्ट्रात का शक्य नाही?’ असा सवाल आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी केला.
आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या तीन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. आता भाजप – शिवसेना सरकार आले आहे. त्यामुळे सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी या युती सरकारवर आहे. त्यामुळे राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. मुख्यमंत्री शिंदे हे खरे शिवसैनिक असल्यामुळे ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी अशी टीका आपचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
वीज कंपन्यांमध्ये (महाजेन्को, महापारेषण, महावितरण) मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्यामुळे विजेचे दर जास्ती आहेत, वीज दर कमी राहण्यासाठी वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे, कच्चा माल म्हणजे आयात कोळसा खरेदीमधील कृत्रिम भाववाढ , देशांतर्गत कोळसा खरेदीतील भ्रष्टाचार, संशयास्पद कोळसा धुणे प्रक्रिया आदि बाबींमुळे निर्मिती खर्च फुगत आहे. त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आपचे डॉ अभिजीत मोरे यांनी केली.
राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी अशी मागणी करण्यात आली.
आजच्या आंदोलनात विजय कुंभार, मुकुंद किर्दत, डॉ अभिजीत मोरे, सुजीत अग्रवाल, आनंद अंकुश, शेखर ढगे, अक्षय दावडीकर, किरण कांबळे, मीरा बिघे, मनोज फुलावरे, किशोर मुजुमदार, धनंजय बेनकर, निलेश वांजळे, प्रभाकर कोंढाळकर, किरण कद्रे, समीर आरवडे, सुनंदा जाधव, सचिन भोंडे, शिवाजी डोलारे, शंकर ठाकर, सतिश यादव, प्रशांत कांबळे, भानुदास रायकर, अविनाश भाकरे, शाहबाझ मेमन, शाहीन मेमन, मनोज शेट्टी, हेमंत बिघे, वीरेंद्र बिघे, सुरेखा भोसले, सुनिता काळे, प्रीती निकाळजे, अजय पैठणकर, संजय कोणे, प्राजक्ता देशमुख, विजय साठे, रवींद्र चोरगे, सारिका भंडारी, सुधाकर गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, राकेश कोकाटे, रमेश राठोड, अमित म्हस्के, अनिल धुमाळ, मिताली वडावराव, रमेश पाडळे, अल्ताफ शेख,गणेश मोरे, जोगिंदर पाल तुरा, रवी लाटे, सुनिल भोसले,सचिन कोतवाल, बापू राईसिंग, संजय कतारनवरे, प्रकाश शेरीकर, निरंजन अडागळे, राहुल कांबळे, सुभाष जाधव, शब्बीर शेख, गोपाळ जांगमल्ले, फहीम खान, रोहन रोकडे, साजिद खान, वैशाली डोंगरे, शंकर थोरात, इकबाल तांबोळी, हर्षल भोसले, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, निखिल देवकर, आरती करंजावणे, ज्योती ताकवले, निखिल खंदारे, ऋषिकेश मारणे, जय गिडवानी, आफताब शेख, सीमा गुट्टे,सचिन मोरे, आसिफ बागवान, माधुरी गायकवाड, मिलिंद ओव्हाल, रमेश मते, सर्फराज मोमीन, अश्विनी सुरवसे, दिलीप गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते.
- आप पुणे शहर मीडिया टिम