पुणे शहर नदी विकास प्रकल्प साठी होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडला युवासेना पुणे शहराचा विरोध..



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : आज महापालिका आयुक्त यांना भेटून त्यांना मुळा मुठा विकास प्रकल्प करताना होणाऱ्या ६००० वृक्षतोडीेस युवासेना पुणे शहराचा विरोध दर्शविण्याात आला. कालच शिवसेना नेते युवासेना प्रमुख मा आदित्य साहेब ठाकरे यांनी विधानसभेत या संदर्भात आवाज उठवला,

 त्या नुसार त्यांच्या आदेशाने आणि युवासेना सचिव वरुण जी सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली सदर  निवेदन देण्यात आले. ६००० झाडे पुण्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करून पुण्याचे स्वास्थ्य चांगले राखण्याचे काम करतात आणि काँक्रिट जंगल उभारताना सदर ठिकाणी होणारी पुण्याची हानी ही न परवडणारी आहे तरी कृपया ह्या निर्णयाचा पुणेकरांच्या हितासाठी फेरविचार करण्यात यावा व हा निर्णय रद्द करण्यात यावा सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांना विश्वासात घेऊन ह्या वर योग्य ती उपाय योजना करण्यात यावी आणि होणारी वृक्षतोड थांबवून नदी विकास प्रकल्प करण्यात यावा असे निवेदन दिले.

आणि जर वृक्षतोड थांबली नाही तर भविष्यात युवासेना पुणे शहर तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ही इशारा देण्यात आला.

सदर निवेदन देताना युवासेना पुणे शहर अधिकारी राम थरकुडे, पुणे शहर समन्वयक युवराज पारीख आणि उपशहर समन्वयक सागर दळवी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post