या प्रकरणी लेखापाल अमन ओझा, देव नारायण दुबे यांच्या विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : रांका ज्वेलर्स पेढीतील लेखापालांकडून एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्का दायक माहिती उघडकीस , या प्रकरणी लेखापाल अमन ओझा, देव नारायण दुबे यांच्या विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या शाखेत 10 सप्टेंबर 2020 ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. अमन ओझा आणि देव नारायण दुबे सराफी पेढीत लेखापाल आहेत. दोघांनी सराफी पेढीचे खाते असलेल्या बँकेच्या धनादेशावर व्यवस्थापकांच्या नावाने बनावट सह्या केल्या. अनोळखी व्यक्तींच्या नावावर त्यांनी बिल तयार केले. त्यानंतर धनादेश अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा करुन ओझा आणि दुबे यांनी पैसे काढून घेतले. दोघांनी एक कोटीहून अधिक रक्कम काढली. दरम्यान, ओझा आणि दुबे यांनी महिनाभराच्या अंतराने नोकरी ही सोडून दिली.
हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर संस्थेच्या व्यवस्थापकांना शंका आली. त्यांनी धनादेशाची पाहणी केली असता धनादेशावर देशपांडे नामक यांची बनावट सही असल्याचे आढळून आले. त्यानंतर देशपांडे यांनी गेल्या दोन वर्षातील हिशोब तपासला. त्या वेळी दोघांनी देशपांडे यांची बनावट सही करुन फसवणूक केल्याचे उघडकीस आले. यानंतर देशपांडे यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.