प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करुन ३० लाखांची खंडणी मागणार्यांनी एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडेही खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रुपेश मोरे यांना कॉल करणार्या अब्दुल खालीद अब्दुल रौफ सय्यद (३२, रा. बाला कम्पाउन्ड, ४/१०, निजामपुरा, घर नं ११/१, नुरशहा मशिदीजवळ दांडेकरवाडी, भिवंडी, ठाणे, मुळगाव आजमगड, सराईबीर, उत्तरप्रदेश) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी मुस्कान शेख, अल्फिया शेख, कुब्रा, इम्तेज शेख या नावाचा वापर करुन फोन कॉल, व्हॉटसअॅप कॉल, व्हिडिओ कॉल केला. फिर्यादीचे मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या ४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच हे पैसे इऑन आय टी पार्कचे समोर उभी असलेल्या इनोव्हा गाडीत ठेवण्यास सांगितले. अनुज गोयल यांनी याबात खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीखक प्रताप मानकर तपास करत आहे.