डायनॅमिक बिझनेस एनव्हायर्नमेंट अँड इंडियन इकॉनॉमी ' विषयावर राष्ट्रीय परिषदेला प्रतिसाद...



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रपुनरशिप डेव्हलपमेंट (आय एम ई डी )च्या वतीने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला 'डायनॅमिक बिझनेस एनव्हायर्नमेंट  अँड इंडियन इकॉनॉमी ' या विषयावरील ही परिषद २१ मार्च रोजी  भारती विद्यापीठाच्या एरंडवणे कॅम्पसमध्ये उत्साहात पार पडली.बँक ऑफ बडोदाच्या फायनान्स विभाग प्रमुख  सीए दिलप्रीत  सिंग आणि एलआयसी म्युच्युअल फंड चे विभागीय प्रमुख लव कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि आय एम इ डी चे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांनी प्रास्ताविक केले.डॉ.सोनाली धर्माधिकारी यांनी स्वागत केले.डॉ.अनुराधा येसूगडे यांनी संयोजन केले.एमबीएचे अभ्यासक्रमाचे १८२ विद्यार्थी या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये सहभागी झाले.संशोधनपर निबंध स्पर्धेचे सादरीकरणसुद्धा या कार्यशाळेत झाले.डॉ.सोनाली धर्माधिकारी, डॉ.रणप्रीत कौर,डॉ सुचेता कांची,डॉ.अनुराधा येसुगडे यांनी संयोजन केले. 





Post a Comment

Previous Post Next Post