प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : -समाजातील लहान लहान सहकारी बँका, त्यांची क्षमता,आणि धोरणे याचा विचार करून त्यांना अधिक ताकद दिली तर नवीन सक्षम समाज रचना तयार होण्यास मदत होईल असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी सांगितले.
भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभा रंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात बँकेच्या गेल्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेणारा सुवर्ण भरारी या विशेष ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरु डॉ अजित रानडे, माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, बॅक अध्यक्षा डॉ रेवती पैठणकर, उपाध्यक्ष दीपा दाढे,मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे आणि संचालक उपस्थित होते.
श्री प्रभु म्हणाले की, सध्याच्या काळात बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळात हे संबंध अधिक दृढ होते पण नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्याने काही प्रमाणावर त्यावर परिणाम झाला आहे असे वाटते. विश्वास हा बँकाचा महत्वाचा घटक आहे. गुंतवणूक करणे हे बँकांचे कर्तव्य आहे. त्यावर ग्राहकांचा विश्वास असतो. हा विश्वास भगिनी निवेदिता बँकेने मिळविला आहे.
डॉ रानडे म्हणाले, या बँकेचे शिस्त बद्ध व्यवस्थापन. कमी असणारे एन पी ए चे प्रमाण हे नक्कीच अतुलनीय आहे. याचा सार्थ अभिमान आहे. आज जागतिक पातळीवर बँका मध्ये काही प्रमाणत अस्थिरता असली तरी चांगले काम करणाऱ्या बँकाच्या नामावलीत या बँकेचा समावेश करायला हवा. या बँकेतील संचालक, अधिकारी कर्मचारी हे विश्वस्त आहेत.आणि वाढत्या अस्थिरतेला रोखण्याचे काम त्यांना करायचे आहे. असे ते म्हणाले.
भाटकर मॅडम यांनी मनोगतात बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.बँक अध्यक्षा पैठणकर यांनी प्रास्ताविकात बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला.मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. उपाध्यक्ष दीपा दाढे यांनी आभार आणि विनया देसाई यांनी सूत्र संचालन केले.
आर बी आय संचालक सतीश मराठे, सहकार आयुक्त अनिल कवडे तसेच बँकिंग विश्वातील पदाधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
प्रवीण वाळिंबे
९८२२४ ५४२३४