प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी बंगलोर येथे कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी त्यांच्या समवेत होते.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. मल्लिकार्जुन खरगे यांनी ऐतिहासिक ठरलेल्या या पोटनिवडणुकीची संपूर्ण माहिती घेतली आणि रवींद्र धंगेकर यांचे अभिनंदन करून म्हटले की, दिवसेंदिवस केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यांमधील भाजप सरकार यांच्या विरुद्धचा जनतेच्या मनातील रोष वाढत आहे. महागाई, बेकारी यामुळे त्रस्त जनतेला परिवर्तन अपेक्षित आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीचा कसबा मतदारसंघातील विजय हा दिशादर्शक आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते यांनी एकजुटीने कठोर मेहनत करून भाजपाच्या बालेकिल्ल्यात विजय संपादन केला. याचाच अर्थ एकत्रित ताकदीने निवडणुका लढविल्या तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे.
आगामी काळातही महाविकास आघाडीच्या रोपाने भाजपसारख्या जातीवादी प्रतिगामी पक्षाचा पूर्ण पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच श्री. मोहन जोशी यांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.