पुणे : सुफी संत हजरत ऐनी शाह
( रहे.) यांचा गुरुवारी ऊर्स ..
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह सहाब किब्ला ( रहे ) यांचा उर्स उर्दु ता. १६ व इंग्रजी महिना तारीख १६ मार्च वार गुरुवार रोजी साजरा करण्यात येणार आहे. गेल्या सहा वर्षापासून हजरत यांचा ऊर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हजरत यांची मजार शरीफ पुणे स्थित भवानी पेठ दुल्हा दुल्हन कब्रिस्तान येथे आहे. या ठिकाणीच उर्स साजरा करण्यात येतो .
सुफी संत हजरत ऐनी शहा (रहे) यांचा ऊर्स हजरत यांचे वारसदार ( जानशिन) हजरत शाह नजीरूद्दीन कादरी उर्फ (मखदुमी) शाह यांचे मार्फतच उरुसाचे सर्व नियोजन केले जाते. त्यांचे प्रमुख गुरू मौलांना गौसवी शहा सहाब ( हैदराबाद) यांचे पुर्व परवानगीने व त्यांचे आदेशा नुसार करतात. सुफी संत हजरत ऐनीशाह रहे. यांचे मुरीद (शिष्य) अखंड महाराष्ट्रभर आहेत. हजरत यांचे सर्व शिष्य हजर राहून उर्साचे सर्व कामकाज पाहतात. सायंकाळी असरच्या नमाज नंतर हजरत यांचे मजार शरीफ वर गिलाफ चादर चढवण्यात येतो व मजार शरीफवर फुल पान करण्यात येतो. लगेच फातीश व दुवाँ करण्यात येते. यानंतर शाह नजीरूद्दीन कादरी उर्फ (मखुदमी शहा) यांचे बयान. होते. यानंतर महाप्रसाद (भोजन) चा कार्यक्रम होतो. व नंतर महिफिले समाचा कार्येक्रम झाले नंतर कार्येक्रम सांगता होते.