महाराष्ट्राच्या भावी राजकारणाला नेमकी दिशा देणारा विजय - मोहन जोशी

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा केलाला दणदणीत पराभव ही महाराष्ट्रातील भावी राजकारणाची दिशा दाखवते. 

सलग ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ देखील महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महाविकास आघाडीने स्वतःकडे खेचून आणला. या मतदारसंघात भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी धनशक्ती व गुंडशक्ती याबरोबरच सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करूनही मतदारांनी भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच नाकारले. केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, त्यांचे प्रदेशाध्यक्ष असा फौजफाटा घेऊन उतरलेल्या भाजपने आजारी असणाऱ्या खा.गिरीश बापट यांनादेखील प्रचारात उतरविण्याचा प्रयत्न केला. काहीही करून निवडणूक जिंकायची यासाठी भाजप कोणत्या थरापर्यंत जातो, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. मात्र कसब्यातील सुज्ञ मतदारांनी भाजपला धिडकारून महाविकास आघाडीला दणदणीत मतांनी विजयी केले. याबद्दल सर्व मतदारांना मी धन्यवाद देतो. 

-मोहन जोशी

उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी

Post a Comment

Previous Post Next Post