जावेद पठाण,रईस सुंडके, हाजी फिरोज शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कोंढव्यातील साईबाबा नगर येथील अबु हनिफा सांस्कृतिक सभागृह येथे सुरु असलेल्या कार्यक्रमाचे वार्तांकन आणि शूटिंग करणाऱ्या पुणे क्राईम न्यूज या यु ट्यूब चॅनेलचे पत्रकार सादिक इब्राहिम मजहारी शेख यांना मारहाण करून मोबाईल फोन,माईक फोडल्याप्रकरणी जावेद पठाण ( माजी नगरसेवक गफूर पठाण यांचे जावई) ,माजी नगरसेवक रईस सुंडके,हाजी फिरोज शेख(माजी नगरसेविका परवीन शेख यांचे पती) यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस स्थानकात अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे.सादिक इब्राहिम मजाहरी शेख हे मुस्लिम धर्मगुरू (आलीम ) देखील आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सादिक इब्राहिम मजाहरी शेख , सामाजिक कार्यकर्ते सचिन आल्हाट यांनी याबाबत माहिती दिली.
१ मार्च रोजी अबु हनिफा सांस्कृतिक सभागृह येथे सुरु असलेल्या कार्यक्रमाचे वार्तांकन आणि शूटिंग करण्यासाठी सादिक इब्राहिम शेख गेले होते. कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांचे शूटिंग बातमीकरिता करीत असताना जावेद पठाण,रईस सुंडके,हाजी फिरोज शेख यांना राग आल्याने चिडून जाऊन त्यांनी मारहाण करून मोबाईल कॅमेरा,बूम,माईक, त्याची डायरी हिसकावून घेतली आणि शिविगाळ केली. या मारहाणीदरम्यान मोबाईल कॅमेरा,बूम,माईक खाली पाडल्याने नुकसान झाले. पत्रकारावर नेहमीच राजकीय तसेच गुंड प्रवृत्तीचे दबाव,धमकी बदनामी,मारहाण हे प्रकार होत आलेले आहेत.या पत्रकारास न्याय मिळावा तसेच सत्य नागरीकांपर्यंत यावे या करीता हि पत्रकार परिषद घेण्यात येत आहे.,असे सादिक इब्राहिम मजहारी शेख यांनी सांगितले. या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न होत असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलीस तक्रार दाखल करण्यासदेखील टाळाटाळ करण्यात आली,असा आरोप शेख यांनी केला.
कोंढवा पोलीस स्थानकात दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिमोटे ,एपी आय शिंदे,क्राईम ब्रँच पी आय संजय मोगले करीत आहेत .