प्रेस मीडिया लाईव्ह :
यावेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण हा क्षण पाहणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. विशेष म्हणजे स्मृतीस्थळावर जमलेल्या पत्रकारांच्या देखील डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्यामुळे काही काळासाठी तिथलं वातावरण अतिशय भावूक बनलं. अश्विनी यांचा त्यांच्या पतीच्या स्मृतीस्थळावरील भेटीचा व्हिडीओ समोर आलाय. संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणाच्याही डोळ्यांमधून पाणी येईल, असाच तो व्हिडीओ आहे.
चिंचवडची पोटनिवडणूक ही जगताप कुटुंबासाठी सोपी नव्हती. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर आधीच मोठं संकट कोसळलेलं होतं. त्यानंतर चिंचवड पोटनिवडणुकीच्या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे उमेदवारी नेमकी कुणाला दिली जाणार यावरुन तिथे चर्चा होती. अनेक चर्चांनंतर भाजपकडून तिथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली.