जागतिक महिला दिनानिमित्त "महाविद्यालयातील स्वच्छता कामगारांचा सत्कार सोहळा व CTET पास विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा" कार्येक्रम संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठ वडगाव येथे दिनांक 8/ 3 /2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त "महाविद्यालयातील स्वच्छता कामगारांचा सत्कार सोहळा व CTET पास विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा" आयोजित करण्यात आला होता. 

प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन, दीप प्रज्वलन व  रोपास जलार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्र. प्राचार्या सौ.आर.एल. निर्मळे -चौगुले मॅडम यांनी महिला दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम म्हणजेच महाविद्यालयातील ज्या महिला सफाई कामगार आहेत, त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार या ठिकाणी करण्यात आला. महाविद्यालयातील स्वच्छता कामगार सौ. वैशाली जाधव, सौ. वैशाली पाटोळे, सौ सुप्रिया पवार , श्री.बबलू कांबळे, श्री.पोपट धनगर यांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ.आर.एल. निर्मळे - चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी त्या स्वच्छता कामगारांना त्यांचा सत्कार केल्याचे पाहून त्यांना आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. स्वच्छता महिला कामगार पाटोळे बोलताना म्हणाल्या की, यापूर्वी आमचा असा सन्मान-सत्कार कोणीच केला नव्हता. महिला दिनानिमित्त या महाविद्यालयाने आमचा सत्कार घेतला असे बोलताना त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक सुजाता कुंभार व प्रमोद पाटील यांचाही CTET परीक्षा पास झाल्याबद्दल सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या निर्मळे मॅडम यांना "सावित्रीच्या लेकी" हा पुरस्कार मिळाल्याबद्दल छात्राध्यापकांनी एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचे अभिनंदन केले. प्रथम वर्षाचे छात्राध्यापक सारिका माने, वर्ग प्रतिनिधी दिव्या माने व द्वितीय वर्ष वर्ग प्रतिनिधी सुप्रिया माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच महाविद्यालयाच्या प्राध्यापिका चरणकर जे. एस. यांनी महिला दिना बद्दल आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ .आर.एल. निर्मळे - चौगुले मॅडम यांनी जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी स्त्री पुरुष समानता तसेच आजची स्त्री यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षाच्या छात्राध्यापिका सरस्वती चव्हाण व दिपाली गुरव यांनी केले व आभार स्नेहल पाटील यांनी केले.तसेच या कार्यक्रमास प्रा. शिरतोडे व्ही.एल.,प्रा.सोरटे.एस.के.,प्रा. सावंत ए.पी., प्रा.चरणकर जे.एस., चौगुले एस.एस., तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक, छात्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post