- विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेत आक्रमक मागणी
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : प्रतिनिधी : सरकारने अर्थसंकल्प सादर करताना ज्या पद्धतीने विविध समाजासाठी महामंडळाची घोषणा केली त्याप्रमाणेच लोकशाहीतील चौथा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्र व्यवसायातील वृत्तपत्र विक्रेते व इतर कर्मचाऱ्यांच्या साठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे अशी आग्रही मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
श्री दानवे यांनी काल विधापरिषदेत बोलताना राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर करताना विविध समाजासाठी महामंडळाची घोषणा करून त्यांच्याकरीता प्रत्येकी 50 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यानंतर अजूनही अनेक समाज, अनेक जातीचे लोक आपल्यासाठी स्वतंत्र महामंडळ मागत आहेत. परंतु मी मात्र समाजातील एका दुर्लक्षित, लोकशाहीत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्रासारख्या अतिशय महत्त्वाच्या यंत्रणेतील अतिशय महत्त्वाचे अशा वृत्तपत्र विक्रेते व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची मागणी करीत आहे असे प्रतिपादन श्री दानवे यांनी केले.
श्री दानवे यांच्या जोरदार मागणीला उत्तर देताना सरकारने या घटकासाठी नक्कीच आश्वासक पावले उचलली जातील अशी आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने मराठी विभागाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप व छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मधील जिल्हा वृत्तपत्र विक्रेता पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी श्री दानवे यांची भेट घेऊन वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली होती. याबाबतचे निवेदन श्री दानवे यांना देण्यात आले होते. त्याची दखल घेऊन श्री दानवे यांनी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी विधानसभेत जोरदार मागणी करत वृत्तपत्र विक्रेत्यांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला.
श्री दानवे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचा प्रश्न राज्यशासनासमोर उपस्थित करून कल्याणकारी मंडळाचे आग्रही मागणी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर कार्याध्यक्ष बालाजी पवार सरचिटणीस विकास सूर्यवंशी कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार यांच्यासह सर्व पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्वच वृत्तपत्र विक्रेता घटकांनी श्री दानवे यांचे मनापासून आभार मानले आहेत शासनाने या वृत्तपत्र विक्रेत्यांची दखल घेऊन लवकरात लवकर स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ घटित करावे अशी विनंती या पदाधिकाऱ्यांनी केली.