राज्यातील 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संपावर

 संपात शाळा, महाविद्यालयांपासून वैद्यकीय कर्मचारीही सहभागी


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : राज्यातील 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

या संपात शाळा, महाविद्यालयांपासून वैद्यकीय कर्मचारीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालये ओस पडले आहेत. तर रुग्णालयीन कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. एवढेच नव्हे तर पुरेसा स्टाफ नसल्याने अनेक रुग्णालयातील शास्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आज दुसऱ्या दिवशीही हा संप सुरूच राहण्याची चिन्हे दिसत आहेत. तर संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारनेही विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post