माथेरान नगरपरिषदेकडून मोठी उलाढाल झाल्याची दिसत आहे
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
गाळे विक्री खरेदी करणाऱ्यांची नावे जाणून घेण्यास माथेरान स्थानिकामध्ये चर्चेला उदान आले आहे .माथेरान गिरीस्थान नगर परिषद हद्दीतील कपाडिया मार्केट हे स्थानिकांच्या व्यापाराचे प्रमुख स्थान आहे या ठिकाणाची वास्तू एकच व्यक्तीने नगर परिषदेला दान केली आहे त्यामुळे या जागेवरील भाडे करू गाळ्याचे हस्तांतर होत नसते असे असताना माथेरान नगर परिषदेने या ठिकाणच्या गाळ्याचे हस्तरण केले असल्याचे उघड झाले आहे याबाबत माथेरान पालिका कडून कर आकारणी करण्याचे पत्रक ही जारी झाले असल्याने माथेरान मध्ये जोरदार खळबळ उडाली आहे
माथेरानचे बाजारपेठ ही सण 18 98 पर्यंत सध्याचे पांडे प्ले ग्राउंड परिसर जवळ होती या मोठी आग लागून संपूर्ण बाजारपेठ आगीच्या भस्मस्थनी पडून बाजूचे काही झोपड्यांना देखील जळून गेले होत्या त्यानंतर माथेरान मधील स्थानिकांची बाजारपेठ मस्जिद समोर सुरू झाली माथेरान मध्ये व्यवसाय करणारे पी एन कापडिया यांची पत्नी पेस्तनजी कापडिया या गंभीर आजाराने त्रस्त होत्या कापडिया यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ एखादी वास्तू उभी राहावी या हेतूने त्यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ सन १०१७ मध्ये बाजारपेठेत दगडी भिंतीचे आणि छतांचे बांधकाम करून विक्रेत्यांसाठी गाळे तयार केले पुढे कपाडिया यांनी स्व:खर्चाने मशिदीच्या खालच्या भागात रतनबाई पेस्टनजी एन. कपाडिया मार्केट नावाची बाजारपेठ बांधून ती नगर परिषदेला बहाल केली होती त्यानंतर या मार्केटमधील गाळे माथेरान पालिकेने भाड्यांने दिले पालिकेला दान केलेली वस्तू असल्याने त्या वस्तूची विक्री करून हस्तांतरण करता येत नाही .
येथे भाडेकरू म्हणून गाळ्याचा वापर करणाऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या उदारनिवास करण्यासाठी इथे लहानसहान व्यवसाय सुरू केला होता यातील अनेक जण आजही इथे भाडे करू म्हणून व्यवसाय करत आहेत तर काही जुन्या भाडे करूनचे निधन झाल्याने या मूल भाडेकरांचे नावे असलेल्या गाळ्यांचे हस्तांतरण नगरपरिषदेने नियमा नुसार त्यांच्या वारसाच्या नावे केले आहेत मात्र या जागेचे मूळ मालक माथेरान नगर परिषदेच्या हद्दीत राहणारे असल्याने या गाळ्याचे दुरुस्ती पालिकेच्या परवानगीनेच करावी लागणार आहे
मागील आठ महिन्यात येथे भाडेकरू म्हणून वर्ष असलेल्या काही मालमत्ते या भाडेकरूनी वारस ऐवजी अन्य लोकांना विक्री विकल्याचे आढळले आहेत तसेच पालिकेच्या मालमत्ते हस्तांतरण यादी काही गाळ्यांचा उल्लेख असल्याचा आढळून आले आहे . एक जून 2022 पासून फेब्रुवारी 2023 पर्यंत हस्तांतरण झालेल्या मालमत्तांचा उल्लेख या कर संकलन यादीमध्ये आहे त्यामुळे येथील गाळ्यांचे हस्तांतरण रक्ताचे नाते नसलेल्या व्यक्तीच्या नावे होते का ? येथे भाडेकरू असलेल्या गाळ्यांची विक्री होऊ शकते का ? असे अनेक प्रश्न आता समोर आले आहेत या मार्केटमध्ये कोणते गाळे अन्य व्यक्तीच्या नावे झाले आहेत याबाबत अधिकूत माहिती पालिकेकडून प्राप्त झाली नसल्याने हे गाळे कोणी विकले आणि कोणी खरेदी केले हे जाणून घेण्यासाठी माथेरानकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे