आमदार खासदाराची जोडी विकासाची शर्यत पूर्ण करेल... खासदार धैर्यशील माने

 कोथळी गावकऱ्यांसाठी आपत्कालीन जीवन वाहिनी रस्त्याचे काम आम्ही मार्गी लावले याचे समाधान-.. डॉ.राजेंद्र पाटील (यड्रावकर)


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोथळी/ प्रतिनिधी

आमच्या खासदारकी व आमदारकीच्या काळामध्ये आम्ही अनेक प्रलंबित प्रश्नांना हात घालत ते पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यात कोथळीतील सन 2005, 2019, आणि 2021 साठी महापुराच्या वेळी गावातून बाहेर जाण्यासाठी एकमेव मार्ग असलेल्या जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या जुन्या शर्यती रोडच्या प्रश्न आम्ही मार्गी लावला याच्यामध्ये मला व खास. धैर्यशील माने यांना समाधान वाटत असल्याचे मत आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी व्यक्त केले, कोथळी येथील कोथळी- निमशिरगांव या राज्य महामार्ग 199 या रस्त्यासाठी जोडणारा ग्रामीण महामार्ग 116 जुना शर्यती रोड असा संबोधित असलेला रस्त्या साठी आमदार राजेंद्र पाटील यांच्या फंडातून 23 लाख व खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून 77 लाख फंड मंजूर रस्त्याच्या उदघाटन प्रसंगी बोलत ते होते. कोथळी सारख्या ग्रामीण भागामध्ये आज कृष्णा- वारणा दोन नद्या असून त्यांच्या पुराचा फटका 2005, 2019, 2021 यावेळी मोठ्या प्रमाणावर बसला होता. महापुराच्या काळात पूर बाधित लोकांना गावातून बाहेर जाण्यासाठी आपत्कालीन मार्ग असलेला जुना शर्यती रोड एकच खुल्ला राहत होता त्यासाठी तातडीने निधी मंजूर व्हावा यासाठी कोथळी मधील लोकप्रतिनिधींनी वारंवार  पाठपुरा करून आम्हाला हा मार्ग चांगला करून देण्यासाठी मागणी केली होती. या मागणीच्या कामी आम्ही लक्ष घालत काम केले असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

यावेळी हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने बोलताना म्हणाले की, कोथळी गावाला आम्ही हा रस्ता मंजूर करून देण्यासाठी सन्माननीय आमदार डॉ.राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्यासोबत याबद्दल चर्चा करून तातडीने हे काम मार्गी लावले आहे. 

 हा जुना शर्यती रोड म्हणजे जुन्या काळातील बैलगाड्यांचा शर्यती रोड म्हणून आहे. शर्यत कोणतीही असो दोन्ही पळणारे बैल हवे असतात, आज कर्म, धर्म संयोगाने मी व आम. राजेंद्र पाटील (यड्रावकर) आम्ही दोघेही सामान्य जनतेसाठी पळणारे  असून शिरोळ तालुक्यात विकासकाम कणभर शिल्लक राहणार नाही असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

यापुढे कोणतेही काम सांगा मी आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आम्ही दोघे मिळून पूर्ण करू,  यावेळी पाणंद रस्ता बाबत काही प्रलंबित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर खासदार माने यांनी सौदागिरी मळा येथील पानंद रस्त्या साठी 24 लाखाचा निधी मंजूर करू अशी ग्वाही दिली. स्वागत विजय खवाटे यांनी केले.

यावेळी शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे व माजी पं.स.सदस्य भैरू हंकारे यांनी मनोगत व्यक्त केले.दरम्यान जुना शर्यती रोडचा रस्ता मंजूर केल्याबद्दल संबंधित शेतकऱ्यांनी आमदार व खासदार यांच सत्कार केला, सरपंच भरतेश खवाटे, उपसरपंच राजश्री सुतार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मोरे, देवगोंडा पाटील, बाहुबली ईसराना, गौतम सावकर, सतीश मलमे, बाबुराव पाटील, अशोक पुजारी, रावसो विभुते, प्रकाश पुजारी, अनमोल करे, राकेश खोद्रे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सनी मगदूम, माजी पोलीस पाटील उत्तम पाटील, हिदाई नदाफ, संतोष उपाध्ये, नामदेव कांबळे, सागर बोरगावे, ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक, भाऊसो मगदूम, राजेश विभुते, राजू मास्तर, शरद कांबळे, नितीन वायदंडे यासह मोठ्या संख्येने नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार यड्राव बँकेचे व्हा. चेअरमन दिलीप मगदूम यांनी मानले.

चौकट- 

 महाराष्ट्रातील 288 आमदारां मधून पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळवत महाराष्ट्रातून आपल्या मतदारसंघासाठी मोठा निधी खेचून आणून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहणाऱ्या आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकरांना जनतेतून  कौतुकाची थाप मिळत आहे, त्यामुळे पुन्हा जोमाने काम करण्यासाठी त्यांना मंत्रीपद मिळणार

असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post