विविध क्षेत्रात उल्लेखानिय कार्य केलेल्या कामगार व कामगार कुटुंबीय माहिलांचा सत्कार करण्यात आला
प्रवाहाच्या विरोधात जातांना स्त्रीयांनी सकारात्मक वाटचाल करावी आणि आपले ध्येय्य , इप्सीत साध्य करावे ...साै.जानकी भोईटे
प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्ट्र शासन – कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतिने जागातिक माहिला दिना निामित्त विविध क्षेत्रात उल्लेखानिय कार्य केलेल्या कामगार व कामगार कुटूांबिय माहिलांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
महिलांना कौटुंबिक आधार असणे हिच त्यांच्या सुधारणेची पहिली पायरी ठरु शकते. पुरुषांनी आपल्या पत्नीला घरातील कामात सहकार्य करुन तिला तिच्या अंगभुत गुणांना ओळखण्यासाठी आणि समृध्द करण्यांस सहकार्य करावे. महिलांना आपल्या शक्तीची जाणीव व्हायला हवी. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांची क्षमता जास्त आहे. त्या क्षमतेचा पुर्ण उपयोग करुन आपल्या कर्तृत्वाने आपला विकास पर्यायाने राष्ट्राचा विकास साधता येणे शक्य आहे. व आपल्या पत्नीच्या आपल्या आायुष्यातील सहकार्याचे मोल नाही. त्याची आठवण ठेवणे आवश्यक असल्याचे पुरुषांना संदेश दिले. पत्नीचे महत्व समजुन घ्या व आयुष्य समृध्द करा असे आवाहन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.साै.आर.एल.निर्मळे, प्राचार्य, अशोकराव माने कॉलेज ऑफ एज्युकेशन पेठ वडगाव यांनी केले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,गट कार्यालय,कोल्हापुर यांच्या वतीने कामगार कल्याण भवन, इचलकरंजी येथे दिनांकः१०-०३-२०२३ रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या कोल्हापुर जिल्ह्यातील कामगार व कामगार कुटूंबिय महिलांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षा साै.जानकी भोईटे, सहाय्यक कामगार आयुक्त, इचलकरंजी यांनी आपल्या मनोगता मध्ये, महिलांसाठी सायंकाळी ७ च्या आत घरात अशी प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली. प्रवाहाच्या विरोधात जातांना स्त्रीयांनी सकारात्मक वाटचाल करावी आणि आपले ध्येय्य , इप्सीत साध्य करावे असे मत व्यक्त केले. हौसलोंसो उडान होती है! या उक्तीप्रमाणे वाटचाल करणे गरजेचे आहे. असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी मा.स्नेहल माळी, कार्यवाह, अनिस, इचलकरंजीव मा.साै.नजमा शेख, गुणवंत कामगार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री.विजय शिंगाडे, कामगार कल्याण अधिकारी, कोल्हापुर यांनी तर सुत्रसंचलन मा.साै,शाहिन चाैगले, केंद्र महिला कल्याण सहाय्यिका, इचलकरंजी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. सचिन खराडेे, केंद्र संचालक, इचलकरंजी यांनी केले या प्रसंगी कु सुहाना समीर चौगले हिने सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा करून व्यक्तिरेखा साकारली
सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री राजेंद्र निकम कल्याण निरीक्षक,सचिन शिंगाडे, कनिष्ठ लिपिक, सचिन खराडे, केंद्र संचालक, विकास पाटील, केंद्र संचालक, चंद्रकांत घारगे, सहाय्यक केंद्र संचालक, दिपक गांवराखे, सहाय्यक केंद्र संचालक, ज्योती डावरे, केंद्र महिला कल्याण सहाय्यिका,, विजय खराडे, केंद्र सेवक मंगला बेळगांवकर, केंद्र सेवक, लता कांबळे, केंद्र सेवक, सुजाता कलकुटकी, केंद्र सेवक,अमित चव्हाण, सचिन पन्हाळकर, सुरक्षा रक्षक व प्रदिप मस्कर, सुरक्षा रक्षक यांनी परिश्रम घेतले.
यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या ०८ कामगार व कामगार कुटूंबिय महिलांचा सत्कार यावेळी करण्यांत आला. त्यांना मंडळाच्या वतीने वरील मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यांत आले. या मध्ये.....१) विजया दत्तात्रय माळी २) कु. शबाना रशीद शिकलगार ३) साै. विद्या उदय भंडारी ४) श्रीमती भाग्यश्री विवेक देसाई ५) श्रीमती सीमा उष्णू गुरुव 6)सुरेखा रामानंद पर्वत गोसावी 7) स्नेहांकिता सागर कदम (वरोटे ) 8) श्रीमती संजीवनी चंद्रकांत सुतार .