नेमकं हे सरकार आहे तरी कुणाचं ? सर्वसामान्य जनतेचं का ठेकेदाराचं



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापूर - पॅन कार्डला आधार कार्डांला लिंक करायला सांगताय ते काय फुक्कट होते का ?  त्याला शंभर रुपये मोजावं लागत्यात आम्ही रोजंदारी करणारी माणसं. आता सरकार म्हणतय की जर नाही लिंक केलं तर हजार रुपये दंड आहे आणि मार्च नंतर म्हनं 5000 रुपये दंड होणार असल्याचे समजतय आता तुम्हीच सांगा सरकार मायबाप आम्ही जगायचं का मरायचं ? ही तर सरासर लोकांची लूट आहे. अगोदर आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक म्हटले तो खर्च झाला आणि आता पॅन कार्ड काढ़त्या वेळी आधार कार्ड जोडल्या शिवाय  पॅनकार्ड निघत नाही त्याच ऑफिसने आधार कार्ड दिलं असताना अध्यापिक आयोजनाचे आधार कार्ड लिंक केलेले नाहीत तरी पण फाईन लावलेले आहेत तरी शासनाने याचा विचार करून ज्या  पॅनकार्ड  काढ़ण्यासाठी आधार कार्ड जोडलेले आहे. अशा सर्व आधार कार्ड प्यान कार्डला स्व्तःहून आयकर विभागाने नोंदी करणे आवश्यक असताना त्यानी तस न करता जनतेला आव्हान केले आहे की आपले आधार कार्ड प्यान कार्डला लिंक करा ही सरकारची चूक आहे या वरती शासनाने विचारपूर्वक विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे.

आता पर्यंत निम्म्या लोकांनी आतापर्यंत लिंक केले आहे उरलेल्या लोकांनी लिंक नाही केले तरी हे लिंक करण्यासाठी शासनाने जनतेचा विचार करून ज्या डिपार्टमेंट मध्ये आधार कार्ड दिलेले आहेत त्यानी परस्पर  पॅनकार्डला आधार लिंक करून घेण्या विषयी सूचना कराव्यात अशी जनतेतून मागणी होत आहे. लोकांचे असे मत आहे की जर मतदान ओळख पत्राला आधार कार्ड लिंक नाही केले तरी त्याला दंड नाही कारण जनतेची मतं जातील मग यालाच का दंड लावता. केंद्र सरकार जनतेला गृहीत धरत असतील तर ते चुकीचे आहे. या सरकारनं जनतेचं जगणं मुश्किल करून टाकलय जनतेनं कशाबद्दल दंड भरायचा अगोदर सरकारने लोकांना बचत खाती मोफत काढ़ून दिली आणि आता हजार रुपये दंड लाऊन वसूल करून घेत आहे.अशी लोकांच्यातुन भावना आहे.सर्वच आधार कार्डला सरकार जोडत आहे तर    EVM मतदान मशीन पण आधाराशी जोडुन घ्या म्हणजे ज्यांच्या अंगठ्याचे ठसे जुळतील त्यानाच मतदान करू द्या म्हणजे बोगस मतदान पण होणार नाही आणि हाताला शाईही लावायची गरज नाही.तरी सरकारने होणारी जनतेची पिळणूक थांबवावी अशी सर्वसामान्य जनतेतुन मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post