कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांनाच तब्बल 8 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.कोल्हापूर पोलीस दलातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील लाचखोर एपीआय आणि आणि कॉन्स्टेबलच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तब्बल 8 लाखांची लाच स्वीकारताना दोघांना कोल्हापूर आणि सांगलीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना जेरबंद केलं. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 8 लाख रुपयांची लाच घेताना जुना राजवाडा पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि कॉन्स्टेबल रुपेश कुंभार या दोघांना सांगली आणि कोल्हापूर येथील लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने मध्यरात्री अडीच वाजता सापळा रचून रंगेहाथ अटक केली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.
सांगली येथील तक्रारदारांमध्ये या संदर्भात सांगली येथील एसीपी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. या पडताळणीनंतर पथकाने ही कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह कॉन्स्टेबल लाच प्रकरणी ताब्यात घेतल्याने कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.