घरफाळा घोटाळ्यात गेल्या 10 ते 12 वर्षांत तब्बल 100 कोटींचा ढपला पाडल्याची जोरदार चर्चा



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने 2011 सालात भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा लागू केला. राज्यात कोणत्याही महानगरपालिकेने त्याची अंमलबजावणी करण्याचे धाडस केलेले नाही , परंतु महानगरपालिकेतील ठरावीक अधिकार्‍यांनी प्रमोशनसाठी कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर भांडवली मूल्याचे भूत ठेवले ,  कालांतराने त्यातून    मोठ्या       प्रमाणात भ-ष्टाचार केला . कॉम्प्युटरमध्ये एडिट व डिलिटचा वापर करून घरफाळा घोटाळ्यात गेल्या 10 ते 12 वर्षांत तब्बल 100 कोटींचा ढपला पाडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. चौकशी अहवालातून त्यातील काही प्रॉपर्टींचा घोटाळाही समोर आला आहे.

 मात्र महापालिकेकडून कायदेशीर कारवाई न करता प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिणामी घरफाळा घोटाळ्याची सेवा निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी, अशी जोरदार  मागणी आता केली जात आहे. भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा लागू करताना जुन्या सिस्टीम मधून सर्व डाटा नव्या सिस्टीमला टाकणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. हजारो प्रॉपर्टींची नोंदच नव्या सिस्टीममध्ये करण्यात आलेली नाही. परिणामी अद्यापही कोल्हापुरातील सुमारे दहा हजारावर मिळकतींना घरफाळा लागू झालेला नाही. अनेक मिळकतींच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेला घरफाळा घोटाळ्यातून फटका बसत आहे. कोल्हापुरात पाचशेच्यावर मोबाईल टॉवर आहेत. वास्तविक त्या टॉवरसाठी लाखो रुपये भाडे आहे. भाडे करारानुसार मोबाईल टॉवरला घरफाळा आकारणी आवश्यक आहे. परंतु तसे न करता फक्त दहा बाय दहा इतक्या जागेवर घरफाळा आकारणी करण्यात आली आहे. त्यातूनही कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post