दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर :राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुश्रीफ यांच्यावर दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली होती. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी छापेमारी होती. ईडीच्या कारवाईविरोधात मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली होती. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी छापेमारी होती. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात धाव घेतली होती. आज मुंबई हायकोर्टात मुश्रीफ यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.
पुढील दोन आठवडे हसन मुश्रीफ यांना अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत. हसन मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.आमदार मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, ब्रिक्स कंपनीतील व्यवहारावरून 'ईडी' च्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे. शनिवारी सकाळी दहा गाड्यांतून सुमारे २४ जणांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यापैकी बारा जणांनी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी छापा टाकला. दुपारी साडेबारापर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर त्यातील सहा जण तेथून निघून गेले.