प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : देशात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला आहे , काहीना काही पळवाटा काढून भ्रष्टाचार सुरुच आहे मग तो खाजगीत असो किंवा शासकीय प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाच्याऱ्याचे जाळे पसरले आहे . शासकीय कार्यालयातून नागरिकां कडुन प्राप्त होणारया कागदपत्रांच्या आधारे दाखले दिले जातात. मात्र काही लोक बनावट कागदपत्रे जोडुन सर्रास दाखले घेत असल्याचे प्रकार आढळून आले आहेत .त्यामुळे प्रशासकीय यंत्रणे कडून या बाबतीत सत्यता पडताळण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
शासकीय यंत्रणेने दाखले देणे पूर्वी खबरदारी घेणे आता गरजेचे आहे , असे केले तरच बनावट कागदपत्रे घेणाऱ्यांना मोठा आळा बसेल आणि वचक पण बसून त्यांची पोलखोल होईल. एका व्यक्तीने तर कोणतेही कागदपत्रे नसताना दाम मोजून रेशन कार्डाला नाव नसताना रेशन कार्ड हरविल्याचा संबंधित विभागा कडून दाखला घेऊन दोन ते तीन वर्षात रेशन कार्डला नाव लावण्यापासून ते आधार कार्डां पर्यत आणि मतदार यादीत नाव घालण्यापर्यंत दाखले काढ़ून शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेत आहेत. या बाबतीत तक्रारदाराने तक्रार केली तरच दाखल्यातील बनावटगिरी उघड होते. ही वेळ येण्यापूर्वी प्रशासणाने कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे केली तरच बनावटगिरी थांबेल व होत असलेल्या भ्रष्टाचाराला मोठा आळा बसेल.