प्रेस मीडिया लाईव्ह :
खालापूर प्रतिनिधी : दिनेश महाडिक
रायगड जिल्हा परिषद अलिबाग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023
केंद्रीय जलशक्ती मंत्रालय व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) हे राष्ट्रीय अभियान राबविण्यात आले होते या कार्यक्रमात ग्रुप ग्रामपंचायत कलोते येथील सरपंच सौ रेश्मा ताई चंद्रकांत ठोंबरे यांनी भाग घेऊन कलोते ग्रामपंचायत हद्दीत या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी या अनुषंगाने प्लास्टिक बंदी ,सांडपाणी, व घनकचरा व्यवस्थापन ग्राम स्वच्छता व पर्यावरण रक्षण या कामासाठी स्वयं प्रेरणेने दिलेल्या योगदानाबद्दल सरपंच रेश्मा ताई ठोंबरे यांस शासनाचे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व व्यवस्था रायगड) सौ . शुभांगी मॅडम नाखले व (मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड) डॉक्टर किरण साहेब पाटील ( भा प्र से) यांच्यामार्फत सरपंच रेश्माताई ठोंबरे यांस प्रशस्तीपत्र सन्मानपूर्वक देऊन गौरविण्यात आले त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र परिसरात कौतुक करण्यात येते