दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ जयंती उत्साहात साजरी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी  : हजारो भाविक सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात येथील श्री स्वामी समर्थ सेवा  व आध्यत्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दिवसभरात विविध आध्यत्मिक सेवा करण्यात आल्या.

नदीवेस नाका येथील अध्यात्मिक केंद्रात सकाळी ८ वाजता भुपाळी आरतीने उत्सवाला प्रांरभ झाला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुर्तीवर शोडषोपचार अभिषेक केल्यानंतर हवनयुक्त श्रीस्वामी याग संपन्न झाला.  10.30 वाजता  नैवेद्य आरतीनंतर  भाविक सेवेकऱ्यांनी मांदीयाळीचा (सामुदायीक सहभोजन) आंनद घेतला. दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप व श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीची वैयक्तीक सेवा करण्यात आली. सांयकाळी 6.30 वाजण्याच्या आरतीने उत्सवाची सांगता झाली. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास केंद्र (दिडोंरी प्रणित) नदी वेस नाका येथील सेवा केंद्रात महाराजांची त्रिकाळ आरती व  मानवीय जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्‍वरीय सेवेतून विनामुल्य मार्गदर्शन अखंडीत चालू असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राचे वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post