संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्टचा पुरस्कार वितरण सोहळा व समाज बांधव तसेच गुणी खेळाडूंचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : संत गाडगे महाराज यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त आज वेदभवन इचलकरंजी येथे संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने  सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री किशोर देशपांडे ( संस्थापक अध्यक्ष - सावली केअर सेंटर, कोल्हापूर ) श्री रवी जावळे ( संस्थापक अध्यक्ष - माणुसकी फौंडेशन,इचलकरंजी ) श्री संजय परीट ( शिक्षक - सरस्वती हायस्कूल, इचलकरंजी ) श्री राजू रजपूते ( कामगार नेते,इचलकरंजी ) श्री गजानन शिरगावे  - सामाजिक कार्यकर्ते ( प्रदेश अध्यक्ष - अखिल भारतीय मानवाधिकार असोसिएशन,मानवी- हक्क दिल्ली,संलग्न संयुक्त राष्ट्रसंघ ) यांना सन्मानचिन्ह व जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले.*

               *याप्रसंगी समाजाचे जेष्ठ समाज बांधव श्री मुकुंद रामचंद्र बने,जेष्ठ भगिनी श्रीमती शांताबाई बाबुराव रसाळ तर जेष्ठ दाम्पत्य श्री अर्जुन कोंडीबा काळे व सौ शारदा अर्जुन काळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करणेत आला.*

              *यावेळी इचलकरंजी शहरातील व्यंकटराव,गोविंदराव, श्रीमंत गंगामाई, बालाजी,गर्ल्स, मणेरे ,सरस्वती व डिकेटीई हायस्कूलचे खेळाडू तसेच ए एस सी व डांगे कॉलेज मधील विध्यार्थी खो-खो,कबड्डी,कुस्ती, वेटलिफ्टिंग,बास्केटबॉल,रोईंग बॉल,रनिंग,सायकलिंग योगासन,लांब उडी ,उंच उडी अशा विविध स्पर्धेत खेळणारे खेळाडू जे मिनी ऑलम्पिक,स्टेट लेव्हल व नॅशनल लेव्हलच्या स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक मेडल जिंकली आहेत अशा 125 गुणी खेळाडू मुलांच्या व मुलींच्या पालकासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला.*

              *याप्रसंगी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रवी माने,माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे,इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चुडमुंगे,उपाध्यक्ष दत्तात्रय लटके,भाजपा नेते धोंडीराम जावळे,उद्योजक विनायक यादव (मिरज) तसेच ट्रस्टचे पदाधिकारी,खेळाडू,पालक व समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*

               *यावेळी सूत्रसंचालन शाहीर संजय जाधव व स्नेहल परीट यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक सौ नयना पोलादे यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे आभार ट्रस्टचे अध्यक्ष आनंदा शिंदे यांनी मानले.*

Post a Comment

Previous Post Next Post