भीमक्रांतीचे महाराष्ट्र भूषण रणरागिनी गौरव पुरस्कार उत्साहात संपन्न

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

   हरोली  (प्रतिनिधी) : 

 भीमक्रांती सोशल फाउंडेशन हरोली ता.शिरोळ यांचेवतीने जागतिक महिलादिनानिमित्त "महाराष्ट्र भूषण रणरागिनी गौरव पुरस्कार २०२३" चे वितरण- मा.डॉ.श्री अशोकराव माने (चेअरमन, शिरोळ तालुका मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी, तमदलगे) यांचेहस्ते व उद्घाटक- मा.डॉ.सुरेश कुराडे, (गडहिंग्लज) आणि मा.डी.एस. डोणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.                                        


   यावेळी प्रमुख पाहुणे- मा.मदनलाल कुलकर्णी, (माजी आमदार, जालना); श्री महेश परीट (माजी उपसरपंच नांदणी); दिपक कांबळे, ग्रा.पं.सदस्य, नांदणी; संजय सुतार (पत्रकार); बाबासाहेब बागडी (सामाजिक कार्यकर्ते); मच्छिंद्र कांबळे (रुई); दत्ता मांजरे, तारळकर (इचलकरंजी); श्रीमती पद्मिनी शिंगे (सामाजिक कार्यकर्त्या, पट्टणकोडोली); सौ.गीता कांबळे (शिरगुपी); कु.आकांक्षा कुंभार (लावणी सम्राज्ञी, सांगली); खंडेराव हेरवाडे (शिरोळ) आदि प्रमुख मान्यवरांसह नांदणी व हरोली मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हालगीवादक- उत्तम बिरणगे व सहकारी (सैनिक टाकळी) आणि नांदणी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज, नांदणी सर्व स्टाफ यांचे विशेष योगदान लाभले.                                 

  यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचे व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे स्वागत- संजय गुरव, सर नांदणी यांनी केले तर प्रास्ताविक- भीमक्रांती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष- बाळासाहेब कांबळे यांनी केले.  सुत्रसंचालन- उदय शिरोळकर, शिरोळ यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार- पत्रकार शिवाजी येडवान (माणकापूर) यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post