रायगड पोलिसांना मोठे आव्हान
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्री गाडीवर दरोडा टाकून प्रवाशांना मारहाण करत 15 तोळे सोने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेण सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळ हॉटेल मिलन पॅलेस समोर घटना घडली. या ठिकाणी चोरट्यांनी गाडीवर दरोडा टाकत चार ते पाच जणांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडे असलेले 15 तोळे सोने लुटले. यानतंर प्रवाशांनी पनवेलमधून 100 नंबरवर फोन करून मदत मागितली.
या प्रकरणी पेण सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. पेण पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेशण विभाग घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे घटनास्थळाला भेट देऊन आढावा घेणार असल्याची देखील माहिती आहे.