खाजगी संस्थेच्या चेअरमनला तेरा हजारांची लाच घेताना जाळ्यात अडकला.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापूर-आरळे ता.पन्हाळा येथील श्री.खंडोबा सहकारी मस्छीमारी संस्था मर्या.आरळे या संस्थेचा चेअरमन श्री.सिताराम पाटलू पोवार वय 48.रा गोसावी गल्ली ,आरळे याला आज लाचलुचपत विभागाने तेरा हजारांची लाच घेताना कारवाई करण्यात आली.त्याच्यावर रात्री उशिरा कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार आणि  त्याचा भाऊ हे वरिल संस्थेत सभासद आहेत.त्या दोघाचा मत्स चा व्यवसाय असून त्या व्यवसाय करिता असलेले जाळे पूरामध्ये वाहून गेले होते.त्याची शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी वरिल संस्थेत अर्ज केला होता.त्यामुळे त्या दोघाना       शासना कडुन अनुदानाची मंजूर रक्क्म त्यांच्या खात्यावर जमा झाली होती.सदर अनुदानाचा  पंचनामा करून वरिल संस्थेने पाठविला होता.त्या बद्दल संस्थेचेअरमन श्री सिताराम पोवार यांनी त्याच्याकडे  तेरा हजारांची मागणी केली होती.या बाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे ता.24/02/23 रोजी तक्रार दाखल केली होती.या अनुष्ंगाने ता. 02/ 03/ 23 रोजी सातवे ता.पन्हाळा येथे पडताळणी करून या दोघाच्याकडे लाचेची मागणी केलेचे निष्पन्न झाले.त्याला आज तेरा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने ताब्यात घेऊन त्याला कोडोली पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा.श्री.अमोल तांबे ,पोलिस अधीक्षक लाप्रवि पुणे,मा.श्री.सुरज गुरव ,अप्पर पोलीस अधीक्षक.लाप्रवि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप       अधिक्षक श्री.सरदार नाळे यांच्यासह श्री.नितिन कुंभार ,पो . निरीक्षक .संजीव बंबरगेकर ,श्रेणी पोसई ,पोहेकॉ 983/विकास माने  पो हेकॉ 1480 /सुनिल घोसाळकर पोना 2061/सचीन पाटील पोका 474/रुपेश माने चापो हेकॉ 613/सुरज अपराध ला प्रवि कोल्हापूर  यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post